

पाली, ता. ११ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यातील भेरव येथील शेतकरी चिंतामण पवार यांच्यावर आपल्याच मालकी हक्काच्या जमिनीसाठी तब्बल पाच वेळा उपोषण करण्याची वेळ आली आहे. सोमवारपासून (ता. ९) चिंतामण पवार पाली तहसील कार्यालयाच्या आवारात बेमुदत उपोषणासाठी बसले आहेत. बुधवारी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही कोणताच तोडगा निघाला नाही.
शेतकरी चिंतामण शंकर पवार यांच्या खासगी मालकीची जागा सर्व्हे नं. १०४ व १०६ सजा आवंढे हद्दीत असून, त्यालगत सर्व्हे नं. १०५ ही मिळकत विकसक पागूर देसाई यांची आहे. विकसक पागूर देसाई यांनी आपली मिळकत विनापरवानगी विकसित करताना शेतकरी पवार यांच्या सर्व्हे नं. १०४ व १०६ या मिळकतीपैकी २२ गुंठे जागेवर अतिक्रमण करून बांधकामे केली आहेत. चिंतामण पवार यांनी वारंवार याचा पाठपुरावा सरकारकडे केला; मात्र प्रशासनाकडून याची दखल घेतली गेली नाही. पर्यायाने २०१८ मध्ये शेतकरी पवार यांनी संविधानिक मार्गाने आमरण उपोषण केले व पोलिस प्रशासनाकडून विकसकावर अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ॲट्रॉसिटी दाखल करण्यात आली; मात्र असे असतानादेखील पागूर देसाई याने केलेली बेकायदा बांधकामे व खोटी कागदपत्रे याबाबत महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आली नाही. त्यानंतर न्याय मिळविण्यासाठी शेतकरी चिंतामण पवार यांना अनेक उपोषणे करावी लागली; मात्र सुधागड पाली तहसीलदारांकडून केवळ खोटी व दिशाभूल करणारी आश्वासने देण्यात आली, असा आरोप पवार यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.