वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा बुडुन मृत्यू
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा बुडून मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १ : माणगाव आणि रोहा तालुक्यात बुडालेल्या दोन व्यक्तींचा मृतदेह शोधून काढण्यात यश आहे. या दोन्ही शोधमोहिमा सह्याद्री रेस्क्यु टीमने राबवत मृतदेह मंगळवार (ता.१) दुपारी शोधून काढले. या दोन घटनांमुळे रायगड पोलिसांनी धोकादायक पर्यटनस्थळावर बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून येणाऱ्या हौशी पर्यटकांना हुसकावून लावण्याची कारवाई सुरु केली आहे.
रोहा तालुक्यातील भालगाव खाडीमध्ये मासेमारी करण्यासाठी गेलेला कांढणे बु, या गावातील संतोष नाकती हा व्यक्ती सोमवारी (ता. ३०) सायंकाळी चक्कर येऊन बुडाला होता. ही घटना देखील सोमवारी (ता.३०) रोजी सायंकाळी घडली होती. अशीच घटना सोमवारी (ता.३०) रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील चन्नाट गावाच्या हद्दीमध्ये घडली. येथे एका धबधब्यामध्ये पोहण्यासाठी मुंबईहून चार युवक आले होते. पोहण्याच्या नादामध्ये ऋषभ पतीपक्का (वय २३ रा. जोगेश्वरी मुंबई, (मुळ राहणार हैदराबाद) याने पाण्यामध्ये झेप घेतली. परंतु पाण्याचा अंदाजा न आल्याने तो त्या ठिकाणी बुडाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.