ज्येष्ठ भजनी कलाकारांचा आरसीएफकडून सन्मान

ज्येष्ठ भजनी कलाकारांचा आरसीएफकडून सन्मान

Published on

ज्येष्ठ भजनी कलाकारांचा आरसीएफकडून सन्मान
अलिबाग, ता. ६ : मैफल अलिबाग या संस्थेतर्फे आषाढी एकादशीच्या निमित्ताने येथील राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टिलायझरच्या कुरूळ वसाहतीमध्ये शनिवारी (ता. ५) आयोजित एका विशेष कार्यक्रमात आरसीएफचे कार्यकारी संचालक (थळ) नितीन हिरडे यांच्या हस्ते अलिबाग परिसरातील ज्येष्ठ भजनी कलाकारांचा सन्मान करण्यात आला.
अलिबाग परिसराला भजनी मंडळाची जुनी परंपरा असून गावोगावी उत्तमोत्तम कलाकारांची मंडळे कार्यरत आहेत. या मंडळांतील जुनीजाणते कलाकार कित्येक वर्षे होतकरू कलाकारांना मार्गदर्शन करून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेची निष्ठेने जोपासना करीत आहेत. आता निवृत्तीच्या मार्गावर असलेल्या या वयोवृद्ध कलाकारांच्या आजवरच्या संगीतसेवेची दखल घेत त्यांना या कार्यक्रमात आरसीएफच्या सहयोगाने शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास आरसीएफचे कार्यकारी संचालक (थळ) नितीन हिरडे यांनी ज्येष्ठ कलाकारांना सन्मानित केले. या वेळी सुविख्यात हरिश्चंद्र लोणारकर (९६, रा. भाल), रमेश नाईक (वरसोली), रमेश खंडागळे (घोटवडे), गोपाळ भिडे (किहीम), शंकर पाटील (ढवर), तुळशीदास पवार (पेझारी), सुरेश गुरव (थळ), गणेश पडते (गुंजीस), विजय काठे (थळ), गजानन दाते (थळ), दामोदर म्हात्रे (वायशेत), श्रीधर पाटील (पेझारी), रमेश पाटील (नवेदर बेली), यशवंत आठवले (चौल) या वयोवृद्ध कलाकारांना सन्मानित करण्यात आले. सन्मान सोहळ्यानंतर सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत कलाकार सायली तळवलकर आणि नागेश आडगावकर यांच्या ‘तीर्थ विठ्ठल’ या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमास अर्चना हरळीकर, महाव्यवस्थापक सुधीर कोळी व सुजाता कोळी, यांसह संगीतप्रेमी रसिक बहुसंख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com