जिल्हा परिषद शिक्षकाने बनविले क्रांतीकारी शैक्षणिक ॲप्स

जिल्हा परिषद शिक्षकाने बनविले क्रांतीकारी शैक्षणिक ॲप्स

Published on

रायगडचा रँचो
जिल्हा परिषद शिक्षकाची शैक्षणिक ॲप्स
हसत खेळत मनोरंजनातून मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना
अमित गवळे, सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. १२ (वार्ताहर) : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणातही क्रांती घडत आहे. याच क्रांतीचा एक भाग म्हणून रायगडस्थित रोहा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, कांटीचे प्राथमिक शिक्षक शरद बबन घुले यांनी इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी अभिनव व अत्यंत उपयुक्त शैक्षणिक ॲप्स विकसित केली आहेत. यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांच्या हस्ते शरद घुले यांचा नुकताच विशेष सत्कार केला.
मुलांच्या बौद्धिक आणि मानसिक क्षमतांचा सखोल विचार करून तयार केलेले ही ॲप्स शैक्षणिक प्रक्रिया अधिक आनंददायक, सुलभ आणि प्रभावी बनवत आहेत. सध्या त्यांची पहिली, चौथी आणि पाचवीची ॲप्स प्लेस्टोअरवर मोफत उपलब्ध आहेत. तसेच दुसरी आणि तिसरीची ॲप्स चाचणी टप्प्यात आहेत. पारंपरिक शिक्षणापेक्षा या ॲप्समुळे मुलांना शिकण्यात अधिक मजा येते. यामुळे त्यांची शिकण्याची आवड वाढते आणि ते स्वयंअभ्यासासाठी प्रवृत्त होतात.
शरद घुले यांनी विकसित केलेल्या या ॲप्समध्ये अनेक नावीन्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. ती त्यांना इतर पारंपरिक शैक्षणिक साधनांपेक्षा वेगळे ठरवतात. मोबाईल व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शिक्षण मनोरंजक व आनंददायी करणारी ही ॲप्स मुलांच्या व पालकांच्या पसंतीस उतरतील. ग्रामीण व शहरी भागातील मुलांच्या अध्यनासाठी ती उपयुक्त व प्रभावी आहेत. ही ॲप्स विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे आकर्षित करणारे माध्यम आहे. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक व पालकांसाठीदेखील उपयुक्त आहेत. मुलांच्या गरजा आणि प्रत्यक्ष अध्यापनाचा अनुभव लक्षात घेऊन ही ॲप्स तयार केली आहेत. त्यामुळे ती अधिक व्यावहारिक आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहेत.
एका जिल्हा परिषद शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी घेतलेला हा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे. ही ॲप्स मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी, त्यांना भविष्यासाठी तयार करणारी आणि शिक्षणाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारी साधने आहेत. घुले यांच्या या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना आधुनिक व प्रभावी शिक्षण उपलब्ध होईल.
- मोहन भोईर, मुख्याध्यापक, रजिप शाळा गंगेची वाडी, पेण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com