माणगाव बुद्रुक विकासासाठी लोकप्रतिनिधींना साकडे

माणगाव बुद्रुक विकासासाठी लोकप्रतिनिधींना साकडे

Published on

माणगाव बुद्रुक विकासासाठी लोकप्रतिनिधींना साकडे
पाली, ता. ३१ (वार्ताहर) ः सुधागड तालुक्यातील पावसाळवाडी व वडाचा माळ, धनगरवाडी या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी माणगाव बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी एकत्र येत प्रशासनाकडे ठोस पाठपुरावा सुरू केला आहे. तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांना या मागण्यांचे निवेदन नुकतेच सादर करण्यात आले.
या निवेदनाद्वारे जोडरस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी तब्बल ५० लाख रुपये निधीची मागणी करण्यात आली. या रस्त्यांमुळे पावसाळी कालावधीत नागरिकांना होणारा त्रास मोठ्या प्रमाणावर कमी होईल, तसेच विद्यार्थ्यांसह महिलांना दिलासा मिळेल. याशिवाय, मूलभूत नागरी सुविधांच्या उभारणीसाठी स्वतंत्र निधीची मागणी आदिती तटकरे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी आमदार सुनील शेळके यांनी ग्रामस्थांना आश्वस्त करत सांगितले की, गावाचा विकास थांबू दिला जाणार नाही. मंत्रालयातून ही सर्व कामे मंजूर करून घेतली जातील. या भेटीचा पुढाकार तानाजी पडवळ यांनी घेतला. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com