कुशल कारागिरांची रोह्यातून रसद

कुशल कारागिरांची रोह्यातून रसद

Published on

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ३ : उत्पादनवाढीसाठी कुशल कारागिरांची वाढती मागणी दूर करण्यासाठी रोहा येथे तीन हजार प्रवेश क्षमता असणारे कौशल्यवर्धन केंद्र सुरू होणार आहे. या माध्यमातून दिघी पोर्ट इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पात उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. यासाठी टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडने पुढाकार घेतला असून २०२६पर्यंत हे केंद्र सुरू होईल.
रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी व औद्योगिक उत्पादनास चालना देण्यासाठी हा प्रकल्प महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यासोबत करण्याचा मानस व्यक्त केला होता. या प्रकल्पांमध्ये दरवर्षी अंदाजे तीन हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाची एकूण रक्कम इमारत बांधकाम व प्रशिक्षण खर्चासहित रुपये ११५.०० कोटी इतकी आहे. एकूण रकमेपैकी रुपये अंदाजे ९८.०० कोटी रक्कम टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उर्वरित खर्च रुपये १७.०० कोटी (वस्तू व सेवाकर वगळून) महामंडळाकडून संचालक मंडळाच्या मान्यतेने उपलब्ध करण्यात आला आहे.
----------------------------------
स्थानिक तरुणांना फायदा
या केंद्राचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (ता. २) झाले. सहा हजार ५६ एकर इतक्या मोठ्या क्षेत्रात दिघी पोर्ट इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी भूसंपादन झाले आहे. वाहतुकीसाठी केंद्रस्थानी असल्याने जगभरातील मोठमोठे उद्योग येण्यास तयार आहेत; परंतु त्यासाठी आवश्यक असलेल्या कुशल आणि आसपासच्या भागातील मनुष्यबळ मिळवण्याचा प्रयत्न आहे. या कौशल्यवर्धन केंद्राचा स्थानिक तरुणांना चांगला फायदा होईल, असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.
----
जागेची आवश्यकता - १८ हजार ५०० फूट (१,७०० चौ.मी.)
केंद्रासाठी इमारतीचे बांधकाम - १२ हजार ५०० चौरस फूट
केंद्रातील अभ्यासक्रम - ९
विद्यार्थी क्षमता - ३,०००
अंदाजे खर्च - ९८.०० कोटी रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com