रजिप सिद्धेश्वर शाळा झाली दीडशे वर्षांची  शाळेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव दिमाखात व उत्साहात संपन्न

रजिप सिद्धेश्वर शाळा झाली दीडशे वर्षांची शाळेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव दिमाखात व उत्साहात संपन्न

Published on

रजिप सिद्धेश्वर शाळा झाली दीडशे वर्षांची
शाळेचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव उत्साहात
पाली, ता. १० (वार्ताहर) ः सुधागड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद सिद्धेश्वर शाळेला तब्बल दीडशे वर्षे पूर्ण झाली आहेत. शाळेचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव माजी विद्यार्थी व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी शाळेला आकर्षक सजावट करण्यात आली होती.
ब्रिटिश राजवटीत सुरू झालेल्या या शाळेमध्ये मुलांना फिल्टर पाणी व्यवस्था असून, इन्व्हर्टर आहे. शाळेसाठी चार कॉम्प्युटर सेट आहेत. शाळेमध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. शिवाय विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक साहित्यदेखील पुरवले जाते. शाळेचे असंख्य विद्यार्थी उच्चशिक्षित झाले आहेत व विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी विद्यार्थी विष्णू मंचेकर हे होते. सुधागडचे तहसीलदार उत्तम कुंभार, गटविकास अधिकारी लता मोहिते, गटशिक्षणाधिकारी साधुराम बांगारे, ग्रुप ग्रामपंचायत सरपंच आशिका पवार, उपसरपंच शरद किंजावडे, सदस्या समृद्धी यादव, केंद्रप्रमुख कैलास म्हात्रे, उद्योजक चंद्रशेखर दुर्वे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमानिमित्त साक्षी यादव यांनी शाळेला इन्व्हर्टर भेट दिला आहे, तर विद्यार्थ्यांना रोप भेट दिली. या वेळी केंद्रप्रमुख कैलास म्हात्रे, मुख्याध्यापिका रोहिणी खामकर, शिक्षक जनार्दन भिलारे, स्वप्नाली मेमाणे, प्रिया काळे यांना सन्मानत करण्यात आले.

अशी बनली शाळा
पहिली ही शाळा विठोबा मंदिर येथे भरत होती. त्यानंतर विद्यार्थी संख्या वाढल्याने अर्धी शाळा गावातील आनंद गद्रे यांच्या घरामध्ये भरू लागली. यानंतर शाळेसाठी जागा स्नेहलता दुर्वे यांनी दान केली आणि सिद्धेश्वर शाळा ६ ऑगस्ट १८७६ रोजी स्थापन झाली.

अनेक पुरस्कार
या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २ अभियान सन २०२४-२५ मधून दोन लाखांचे बक्षीस प्राप्त झाले आहे. शालेय परसबाग २०२५ तालुका स्तर प्रथम व २०२४ परसबाग द्वितीय क्रमांक मिळाला आहे.

सुवर्णमहोत्सव कार्यक्रम उल्लेखनीय झाला. सरकारी शाळा वाचवायच्या असतील, तर माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यायला हवा. या कार्यक्रमाद्वारे सरकार शाळांकडे लक्ष देईल, शाळांचा दर्जा सुधारेल. परिणामी, मराठी सरकारी शाळा बंद पडणार नाहीत.
- उमेश यादव, माजी सरपंच, सिद्धेश्वर ग्रुप ग्रामपंचायत

फोटो ओळ
पाली ः शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त शाळेला आकर्षक सजावट करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com