बाप्पाला आवडे तेरड्याची आकर्षक फुले  रानोमाळ बहरली  गौरी गणपती सणाला विशेष महत्व

बाप्पाला आवडे तेरड्याची आकर्षक फुले रानोमाळ बहरली गौरी गणपती सणाला विशेष महत्व

Published on

बाप्पाला आवडे तेरड्याची आकर्षक फुले रानोमाळ बहरली
गौरी गणपती सणाला विशेष महत्त्व
पाली, ता. २४ (वार्ताहर)ः जिल्ह्यात माळरान, डोंगर उतार, शेताच्या बांधावर आकर्षक तेरड्याची फुले बहरली आहेत. जांभळट, फिकट गुलाबी, तांबडे किंवा पांढरे अशा विविध आकर्षक रंगांची सगळ्यांचेच लक्ष वेधत आहेत. गणपतीबरोबर येणाऱ्या गौरी मातेला फुले अर्पण केली जातात. त्यामुळे झाडाला गौरी किंवा गौरीची फुले किंवा गुल मेहंदी, असे म्हटले जाते.
रानोमाळ बहरलेली आकर्षक रंगीबेरंगी फुले येथील पर्यटक, नागरिक, प्रवासी सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. फुलांचा वापर गणपतीमध्ये माटोळीसाठीदेखील केला जातो. चातुर्मासात तेरड्याचे महत्त्व पूजेसाठी असते. गौरीच्या पूजेत तसेच पिठवरीच्या पूजेतही तेरडा हा लागतो. पिठोरी अमावस्येला ‘पात्री’ म्हणून तेरडा आणावा लागतो. गौरी गणपतीच्या सणाला पूजेकरिता तेरड्याची पाने फुले वाहतात.
़़़़़़़़़़ः-------------------------------------
नाजूक फुले प्रकार
तेरड्याची फुले अतिशय नाजूक असून, पावसाळ्यात माळरान, रस्त्याच्या कडेला याची रोपे आपोआप उगवतात. फुलांचे सिंगलचा तेरडा, डबलचा तेरडा तसेच संकरीत तेरडे असे विविध प्रकारदेखील आहेत. या फुलांचे आयुष्य फक्त पाच ते सात दिवस असते.
-----------------------------------------------
औषधी, अन्य उपयोग
तेरडा हा पित्तशामक असून, फुले पौष्टिक असतात. फिलिपिन्समध्ये फुलांचा उपयोग कंबरदुखीसाठी होतो. फुलांमध्ये अँटीबायोटिकसारखे गुण सापडले आहेत. ज्यामुळे काही बॅक्टेरिया, फंगस नष्ट होतात. फुले थंडावा देणारी असून, भाजलेल्या जागी लावतात. आशियातील काही देशांत ही वनस्पती संधिवात, अस्थिभंग आणि बद्धकोष्ठता विकारांवर वापरतात.

Marathi News Esakal
www.esakal.com