प्रवासातील विघ्नांचे हरण

प्रवासातील विघ्नांचे हरण

Published on

प्रवासातील विघ्नांचे हरण
जिल्ह्यातील तीन बस आगारांचे नूतनीकरण
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ३१ : रायगड जिल्ह्यातील बहुतांश बसस्थानके मोडकळीस आलेली आहेत. त्यामुळे शहराच्या मध्यभागी असलेल्या बसस्थानकांच्या ठिकाणी व्यापारी संकुल उभारून प्रवाशांना सुविधा देण्यावर भर देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच थांब्याची सुविधा, पंखे, डिजिटल माहितीफलक, उद्घोषणा यंत्रणासह शौचालयांचे नूतनीकरण केले जाणार असून पेण, नागोठणे, महाड बसस्थानकांच्या कामाला सुरुवात झाली.
शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या बस आगारांच्या जमिनीवर अतिक्रमण वाढले आहे. अनेक आगारांमध्ये गर्दुल्ल्यांचा उपद्रव, फेरीवाले यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे बस आगारांच्या बकालपणामुळे रात्रीचा प्रवास करणे महिलांसाठी भीतीदायक ठरत आहे. बस आगारांमध्ये दिवे, शौचालये यांची दुरवस्था झाली असल्याने रात्रीच्या मद्यपींचा वावर वाढला आहे. त्यामुळे हे सर्व प्रकार रोखण्यासाठी आगारांचे नूतनीकरण केले जाणार आहे. याच अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील पनवेल, अलिबाग, पेण आणि रोहा आगारांच्या डागडुजीसाठी तीन कोटी ६७ लाखांचा निधी राज्य परिवहन मंडळाने मंजूर केला असून प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.
-------------------------------
डागडुजी होणारी बसस्थानके
नाव खर्च कामांचे स्वरूप
पनवेल ९६ लाख फलाट, रंगकाम, गटारे, पाणी आणि शौचालयांची दुरुस्ती
अलिबाग १ कोटी ७४ लाख छताचे नवीन पत्रे, फलाट, शौचालयाची दुरुस्ती, अंतर्गत रस्ते
पेण ६७ लाख छताचे नवीन पत्रे, फलाट, शौचालयाची दुरुस्ती
रोहा ३० लाख शौचालय, प्रवासी शेडची दुरुस्ती, रंगकाम
-----
अलिबाग बस आगाराचा नव्याने प्रस्ताव
अलिबागमध्ये पर्यटनवाढीला चालना मिळू लागली आहे. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना वाहतुकीच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी ६५ वर्षे जुन्या एसटी स्थानक नव्याने बांधण्याचा निर्णय २०१९ मध्ये एसटी महामंडळाने घेतला. पुणे येथील डिरोक्ट्रिक इंजिनिअरिंग या कंपनीकडून मे २०१९ मध्ये स्थानकातील मातीचे परीक्षण करून इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला. तळ मजला व पहिला मजला अशी ही इमारत बांधण्यात येणार होती; परंतु अलिबामध्ये सात मजल्याच्या इमारती बांधण्याची परवानगी मिळाल्याने नव्याने आराखडा तयार केला जात आहे.
------
नूतनीकरणातील इतर सुविधा
- प्रवाशांसाठी प्रतीक्षालय, उपाहारगृह, प्रसाधनगृह, पार्सल खोली, महिलांसाठी हिरकणी कक्ष, आरक्षण कक्ष, स्थानक कार्यालयाची रंगरंगोटी, छताचे पत्रे बदलून नव्याने टाकणे, संरक्षण भिंत बांधणे, चालक व वाहकांसाठी विश्रांती व तेथील सुविधांची दुरुस्ती.
- अलिबाग, पेण, नागोठणे, गोरेगाव, माणगाव, श्रीवर्धन स्थानकांच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून धूळखात होते. यातील अलिबाग, पेण, महाड बस आगारांच्या नूतनीकरणास सुरुवात झाली आहे. बांधकामांऐवजी बसस्थानकाच्या डागडुजीकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
-----------------------------------
रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग, महाड, रोहा बस आगारांसह तेथील स्थानकांचे नूतनीकरण केले जात आहे. उर्वरित बस आगारांचे काम काही दिवसांतच सुरू होईल. प्रवाशांना कोणत्याही वेळेत बसस्थानकात तणाव, भीतीमुक्त वातावरण असावे, यासाठी ही दुरुस्ती महत्त्वाची आहे.
- दीपक घोडे, विभाग नियंत्रण, राज्य परिवहन महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com