गद्दारांना धडा शिकवा ः जयंत पाटील

गद्दारांना धडा शिकवा ः जयंत पाटील

Published on

गद्दारांना धडा शिकवा ः जयंत पाटील
आगामी निवडणुका शेकाप मविआसोबत लढणार
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ४ : पक्षाने ज्यांना मोठे केले, त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. त्या गद्दारांना शून्य बनवण्याची ताकद प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आहे. जिल्हा परिषदेवर सत्ता कायम राहील, या दृष्टीने जिद्दीने, चिकाटीने काम करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शेकाप सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांनी केले. या वेळी आगामी निवडणुका इंडिया आघाडीसह महाविकास आघाडीतर्फे लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी कामगार पक्ष, रायगड जिल्हा चिटणीस मंडळ, नवनिर्वाचित पदाधिकारी, बैठक चेंढरे येथील पीएनपी नाट्यगृहात बुधवारी (ता. ३) पार पडली. या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जयंत पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाचा मतदार आजही कायम आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यात साडेचार लाख मते पक्षाला मिळाली आहेत. आगामी काळात वेगळा पॅटर्न घेऊन काम करण्याचा मानस आहे. बूथ स्तरावर मतदारापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यासाठी वेगवेगळ्या आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. साडेचार हजारांहून अधिक पदे निवडली आहेत. पक्षाने प्रत्येकाला चांगले काम करण्याची संधी दिली आहे. पक्षाचे महत्त्व तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.
------------------------------
‘विरोधकांना धडकी भरणार’
शेतकरी कामगार पक्षाचा दर्जा कायम ठेवण्यासाठी काम करायचे आहे. पुढे निवडणुका होणार आहेत. प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केल्यास निवडणूक सर्वांसाठी सोपी ठरणार आहे. विरोधकांना धडकी भरेल, अशा पद्धतीने महिला आघाडीसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com