आपल्या संस्कृतीची जपणूक आवश्यक  चिवे आश्रमशाळेत सकाळ एनआयई उपक्रमात तज्ञ मार्गदर्शक डॉ. संतोष मोरे यांनी सांगितले महत्व

आपल्या संस्कृतीची जपणूक आवश्यक चिवे आश्रमशाळेत सकाळ एनआयई उपक्रमात तज्ञ मार्गदर्शक डॉ. संतोष मोरे यांनी सांगितले महत्व

Published on

आपल्या संस्कृतीची जपणूक आवश्यक
आश्रमशाळेत ‘सकाळ एनआयई’ उपक्रमात डॉ. संतोष मोरे यांचे प्रतिपादन
पाली, ता. ११ (वार्ताहर) ः अनुदानित आश्रमशाळा चिवे येथे ‘सकाळ एनआयई’तर्फे आपल्या संस्कृतीची जपणूक करा या विषयावर मार्गदर्शन उपक्रम आयोजित केला होता. यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. संतोष मोरे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीचे महत्व व तिच्या जपणूकीची आवश्यकता का आहे याबाबत सांगितले.
संतोष मोरे म्हणाले की, आपल्या संस्कृतीची जपणूक करणे हे केवळ आवश्यक नाही, तर ते आपले कर्तव्य आहे. आपली संस्कृती ही आपली ओळख असून ती आपल्याला इतिहासाशी आणि मूल्यांशी जोडून ठेवते. बदलत्या काळात आधुनिकतेचा स्वीकार करताना, आपण आपल्या मूळ चालीरीती, परंपरा आणि नैतिक मूल्यांचा विसर पडू न देता त्या पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे किती महत्त्वाचे आहे, यावर भर दिला पाहिजे, असे त्यांनी विविध उदाहरणे देत सांगितले.
चिवे आश्रमशाळेतील ‘सकाळ एनआयई’ उपक्रमांतर्गत आयोजित या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या संस्कृतीबद्दल आदर आणि तिच्या जतनाची भावना निर्माण होण्यास मदत झाली. या कार्यक्रमास चिवे आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका (माध्यमिक) सुनिता पिंगळे यांच्यासह शिक्षिका सुजाता चव्हाण, रंजना काळे, रंजना चाटे, रोशनी रुईकर व मार्गदर्शक डॉ. संतोष मोरे व राजेश थळकर आणि विद्यार्थी उपस्थित होते.

‘सकाळ एनआयई’तर्फे आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीचे महत्व कळाले. त्यांच्यामध्ये आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान व अस्मिता निर्माण झाली. यावेळी तज्ञांनी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम अतिशय नियोजनबद्धपणे पार पडला. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद सुद्धा खूप छान होता.
- सुनीता पिंगळे, मुख्याध्यापिका, आश्रमशाळा, चिवे

‘सकाळ एनआयई’च्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन आदर्श मूल्यांची रुजवणूक होत आहे. शिवाय ते देशाचे सजाण व कर्तबगार नागरिक बनण्यास तयार होतात. या उपक्रमांना शुभेच्छा.
- रविंद्र लिमये, अध्यक्ष, कुलाबा जिल्हा आदिवासी सेवा मंडळ, पाली


फोटो ओळ,
पाली ः विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना डॉ. संतोष मोरे, सोबत राजेश थळकर, मुख्याध्यापिका सुनीता पिंगळे व शिक्षिका

Marathi News Esakal
www.esakal.com