विद्यार्थ्यांनी जाणले वन्यजीवांचे महत्त्व

विद्यार्थ्यांनी जाणले वन्यजीवांचे महत्त्व

Published on

विद्यार्थ्यांनी जाणले वन्यजीवांचे महत्त्व
सुधागड तालुक्यात वन्यजीव सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा
पाली, ता. ११ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यातील स्वामी विवेकानंद हायस्कूल तसेच आश्रमशाळा चिवे येथे १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. वनक्षेत्रपाल प्रशांत रमेश निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांसोबत विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात आले.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धनाचे महत्त्व समजावून देणे हा होता. कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, चित्रकला व पोस्टर स्पर्धा, व्याख्याने, तसेच वन्यजीव जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. वन्यजीव आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी जागरूक राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन यावेळी वनविभागातील अधिकारी यांनी केले. सहायक लागवड अधिकारी सुहास रामचंद्र रणवरे यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या भाषेत निसर्गचक्रातील वन्यजीवांची भूमिका समजावून सांगितली. त्यांनी उदाहरण देत स्पष्ट केले की, तृणभक्षी प्राणी गवत खाऊन त्यावरील कीटकांचा प्रभाव कमी करतात, ज्यामुळे रोगराई पसरत नाही. त्याचप्रमाणे मांसभक्षी प्राणी तृणभक्षी प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवून पर्यावरणाचा समतोल राखतात. पक्षी मात्र या प्राण्यांच्या शरीरावरील कीटक खाऊन त्यांना स्वच्छ ठेवतात, त्यामुळे गावात रोगांचा प्रसार होत नाही. या सविस्तर मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांविषयी प्रेम, कुतूहल आणि जबाबदारीची भावना निर्माण झाली. कार्यक्रमात मुख्याध्यापक खरे, सुनीता पिंगळे, कदम, रंजना तसेच इतर शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com