बच्चन यांच्याकडून अलिबागमधील तीन विकसित भुखंडांची खरेदी
बच्चन यांच्याकडून अलिबागमधील
तीन विकसित भूखंडांची खरेदी
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १० ः बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी अलिबाग येथे भूखंड खरेदी केला आहे. एकमेकाला लागून तीन विकसित भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ९,५५७ चौरस फूट असून त्यांची किंमत सुमारे ६.६ कोटी रुपये आहे.
मांडवा बंदराजवळील मांडवा दस्तुरी फाटा येथे हे भूखंड असून ‘द हाउस ऑफ अभिनंदन लोढा’ या विकसकाच्या ‘ए अलिबाग फेज २’ या प्रकल्पाचा हा भाग आहे. या व्यवहाराची नोंदणी मंगळवारी (ता. ७) रोजी नवान्न पौर्णिमेच्या दिवशी झाली. गुरुवारी (ता. २) दसऱ्याचा मुहूर्त साधत अमिताभ बच्चन यांनी लोढा विकसकाच्या मुंबईतील कार्यालयात बुकिंग केली होती, अशी माहिती विकसकाकडून देण्यात आली आहे. मुंबईतील अनेक मोठे उद्योजक, चित्रपट कलाकार, क्रिकेटपटू यांनी यापूर्वीच अलिबागमध्ये जमिनी विकत घेत आपले आलिशान सेकंड होम तयार केले आहेत. यात आता अमिताभ बच्चनदेखील सहभागी झाले आहेत.
निसर्ग आणि समुद्रकिनारी घराचा मोह प्रतिष्ठित व्यक्तींना आवरता येत नाही; मात्र यात नियमांचे उल्लंघन होत असल्याने प्रतिष्ठित व्यक्ती अडचणीत सापडू लागल्या आहेत. समुद्रकिनारी सागरी नियमन रेषा (सीआरझेड) अधिनियमाचे भंग झालेल्या ३०० हून अधिक बांधकामांवर कारवाईची टांगती तलवार आहे. तर अनेक व्यवहार बेकायदा असल्याचे आढळून आले आहेत. यापूर्वी एप्रिल २०२४ मध्येही अमिताभ बच्चन यांनी याच विकसकाकडून सुमारे १०,००० चौरस फूट भूखंड सुमारे १० कोटी रुपयांना खरेदी केला होता; मात्र तेथील घर अद्याप बांधून पूर्ण झालेले नसल्याचे सूत्राने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.