बागायतदार आर्थिक संकटात

बागायतदार आर्थिक संकटात

Published on

बागायतदार आर्थिक संकटात
५,२४४ जणांना पीक विम्याची प्रतीक्षा; अनिश्चित हवामानाचा फटका
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १५ : पावसाने आंबा, काजू पिकावर विपरीत परिणाम झाला होता. त्यानंतर मेमध्ये पडलेल्या पावसाने बाजारात आलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले, मात्र नुकसानीच्या बदल्यात बागायतदारांनी विम्यातील एक रुपयाचाही परतावा मिळाला नसल्याने आर्थिक संकट ओढावले आहे.
रायगड जिल्ह्यातील आंबा बागांचे नुकसान होण्याची अनेक कारणे आहेत. निसर्ग चक्रीवादळापासून जिल्ह्यात फळपीक विमा काढण्याचे प्रमाण वाढले होते. गेल्या वर्षी ५,२४४ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता. या परताव्याची रक्कम काही कोटींच्या घरात आहे, पण हा परतावा कधी मिळेल, याची श्वाश्वती अजूनही आंबा बागायतदारांना नाही. आंबा पिकासाठी प्रति हेक्टरी १४ हजार ४५० रुपये हप्ता भरला होता, तर काजू पिकासाठी दोन हजार रुपये विम्यासाठी हप्ता भरला होता, पण येणाऱ्या हंगामासाठी तितकाच हप्ता ऑनलाइन भरावा लागणार आहे.
----------------------
बागायतदरांच्या नुकसानीची कारणे
सततचा पाऊस ः डिसेंबर, जानेवारीत मोहोर येण्याच्या किंवा फळधारणा होण्याच्या वेळी अवकाळी पावसाने आंब्याचा मोहोर गळतो किंवा लहान फळे (कैऱ्या)गळून पडले. यामुळे उत्पादनात मोठी घट होती. त्याचबरोबर मेमध्ये पडलेल्या पावसाने हातातोंडाशी आलेला पीक वाया गेले होते.
---------------------
​बदलते तापमान ः सातत्याने पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण, दिवस आणि रात्रीच्या तापमानातील आर्द्रतेत सतत होणाऱ्या चढ-उतारामुळे फळगळती मोठ्या प्रमाणात झाली होती. चांगला मोहोर येण्यासाठी आवश्यक थंडी पडली नसल्याने मोहोर कमी झाला होता.
-------------------------
रोगांचा प्रादुर्भाव : तुडतुडे, फुलकिड्यांमुळे फळांवर काळे डाग पडण्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. या सर्व कारणांमुळे रायगडमध्ये आंब्याचे उत्पादन अपेक्षेपेक्षा ५० टक्क्यांपर्यंत कमी झाल्याची नोंद आहे.
-----------------
​दर्जावर परिणाम : कीड, रोग तसेच अनियमित हवामानामुळे फळांच्या गुणवत्तेवर (दर्जावर) परिणाम होतो. ज्यामुळे निर्यातीवरही परिणाम होतो. ​या नुकसानीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी फवारणी, खत नियोजन करतात. तसेच शासनाकडून नुकसानभरपाईची मागणी करतात.
-----
विम्यासाठी पाठपुरावा
नुकसानीचे पंचनामे वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात आलेले आहेत. पुढील काही दिवसांत विम्याचा परतावा मिळू शकेल, असा आशावाद फळपीक विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक कार्तिक नागरे यांनी दिली. यंदाही फळपीक विम्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. रायगडमध्ये शेवटच्या टप्प्यात पीक विमा काढण्याचे प्रमाण जास्त आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत ठरावीक टप्पा गाठण्याचा विश्वास विमा कंपनीला आहे.
----
विमा कंपनीच्या निकषांमध्ये लहान बागायतदार बसू शकत नाहीत. पर्जन्यमान यंत्रे सर्वच मंडळ आणि सजामध्ये अद्याप बसवण्यात आलेले नाहीत. याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यातच परतावा मिळण्याची काहीच शाश्वती नसल्याने येतील बागायतदार, शेतकरी विमा योजनेपासून दूर जातात. विम्याचे हप्ते व्यवस्थित भरणाऱ्यांचीदेखील परिस्थिती खूपच चिंताजनक आहे.
- वरुण पाटील, आंबा बागायतदार, नारंगी-अलिबाग
---
फळ पीक विमा उतरवणारे बागायतदार
अलिबाग
कर्जत
खालापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com