तंत्रशास्त्र विद्यापीठात सशक्त नारी सशक्त परिवार अभियान

तंत्रशास्त्र विद्यापीठात सशक्त नारी सशक्त परिवार अभियान

Published on

तंत्रशास्त्र विद्यापीठात सशक्त नारी सशक्त परिवार अभियान
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १८ : लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या वतीने सशक्त नारी सशक्त परिवार उपक्रम राबवण्यात येत आहे. याचा भाग म्हणून हेल्थ केअर सेंटर व स्त्रीशक्ती स्वयंसिद्धा यांच्या विद्यमाने आणि आयसीटीसी विभाग व उपजिल्हालय रुग्णालय माणगाव यांच्या मदतीने विद्यापीठ व विद्यापीठ परिवारातील विद्यार्थी महिलांसाठी मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन बुधवार (ता.१५) रोजी करण्यात आले.
या शिबिरांमध्ये सीबीसी, एलएफटी, आर. एफ. टी प्रोफाइल, थायरॉईड एचबीएवन सी, विटामिन बी १२, व्हीआयटी-डी तसेच मासिक पाळी संदर्भातील इत्यादी तपासणी एफएसएच, एलएच, प्रोलॅक्टिन इत्यादी तपासण्या करण्यात आल्या. या शिबिरामध्ये (एकूण ४१७ )विद्यापीठातील पदवी व पदविका विभागातील सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षक अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. हे शिबिर यशस्वी होण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समन्वयक डॉ. सोनाली म्हात्रे ,वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा नलबलवार, व डॉ. त्रिशला वाघमारे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी व उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथील कर्मचारी यांनी विशेष असे परिश्रम घेतले. हा कार्यक्रम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाला असून विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अमित शेष, अधिष्ठाता डॉ. संजय नलबलवार, अधिष्ठाता डॉ. सचिन पोरे व इतर अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com