वर्चस्वासाठी महायुतीत रस्सीखेच
वर्चस्वासाठी महायुतीत रस्सीखेच
जागा वाटपावरून तिढा; समान जागांचे सूत्र अमान्य
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २८ ः स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीतील मित्रपक्ष जागावाटपावरून आक्रमक झाले आहेत. सत्ता मिळवण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावली आहे. तर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे वर्चस्वासाठीची रस्सीखेच शिगेला आहे.
निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र अपेक्षित होते; परंतु राजकीय रणधुमाळीत महाविकास आघाडीचे अस्तित्व दिसेनासे झाले आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेते महायुतीत दाखल झाले आहेत. त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या जागांसाठी दावेदारी केली. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणांत मित्रपक्षांमधील कुरघोड्यांमुळे अधिकच रंगत आली आहे. विशेषतः शिवसेना, राष्ट्रवादीचे नेते गळे पकडण्याची भाषा बोलू लागले आहेत. सभा, समारंभात मित्रपक्षाचे नेते एकमेकांना आव्हान, प्रतिआव्हान देत राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न करीत आहे. या सर्व परिस्थितीत भाजप दोन्ही मित्रांचे भांडण तटस्थपणे पाहत आहे.
----------------------------
२०-२०-२०चे सूत्र अमान्य
जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी २०-२०-२०चे सूत्र मांडले होते; परंतु भाजप, शिवसेनेच्या नेत्यांना हे सूत्र मान्य नाही. जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आणि भाजपचे तीन आमदार आहेत. तर राष्ट्रवादीचा एकच आमदार असल्याने जास्त जागा निवडून आणण्याची क्षमता आमच्यात असल्याचे म्हणणे भाजप-शिवसेनेच्या नेत्यांचे आहे. त्यामुळे हा फॉर्म्युला त्यांनी धुडकावून लावला.
-----
बंडखोरीची शक्यता
निवडणूक कार्यक्रम काही दिवसांतच जाहीर होईल. त्यापूर्वी महायुतीला जागा निश्चित कराव्या लागणार आहे. जागावाटपात अनेकजण नाराज होणार असल्याने महायुतीमध्ये बंडखोरी होण्याची जास्त शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीमधील काही नेते हे प्रत्यक्ष बोलूनही दाखवत आहेत. महायुतीत येण्यापूर्वी आम्हाला अनेक आश्वासने देण्यात आली होती. ती पूर्ण करावी लागतील, असे या नेत्यांचे म्हणणे आहे.
----
महाविकास आघाडी नेतृत्वहीन
भाजपचे नेते अंतर्गत बैठकांवर भर देत आहेत. त्यांनी उमेदवारांची पहिली यादी तयार केली असल्याची माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली. या राजकीय रणधुमाळीत महाविकास आघाडी स्थानिक पातळीवर नेतृत्वहीन असल्याने त्यांना अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

