मैत्रीचा कृतज्ञता सोहळा आणि सामाजिक बांधिलकीचा वसा! ग.बा.वडेर हायस्कूलच्या १९८६ च्या बॅचचा ऐतिहासिक स्नेहमेळावा संपन्न

मैत्रीचा कृतज्ञता सोहळा आणि सामाजिक बांधिलकीचा वसा! ग.बा.वडेर हायस्कूलच्या १९८६ च्या बॅचचा ऐतिहासिक स्नेहमेळावा संपन्न

Published on

मैत्रीचा कृतज्ञता सोहळा
ग. बा. वडेर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
पाली, ता. १७ (वार्ताहर) ः शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देणे आणि मित्र-मैत्रिणींच्या सहवासात पुन्हा एकदा बालपण जगणे, हा आनंद काही वेगळाच असतो. असाच एक अनोखा स्नेहमेळावा ग. बा. वडेर महाविद्यालयात १९८६ च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी नुकताच पार पडला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी गरजूंना शैक्षणिक मदत करण्याचा निर्णय घेतला.
स्नेहमेळाव्यासाठी मुंबई, पुणे येथूनच नव्हे तर सांगली, मिरज अशा लांबच्या शहरांतूनही माजी विद्यार्थी आले होते. यामध्ये प्रामुख्याने वकील, इंजिनिअर, शिक्षक आणि उद्योजकांचा समावेश होता. विशेषतः डॉ. हेमंत निकम हे सध्या परदेशातील एका कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहेत, त्यांनी आपल्या यशाचा प्रवास उलगडत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात आयोजक सीमा मपारा व सचिन दाभोळकर यांनी केली. शलाका गद्रे यांच्या खुमासदार निवेदनाने कार्यक्रमात रंगत आणली. प्रियंका गोडबोले आणि प्रमोद द्रविड यांनी तबल्याच्या साथीने सादर केलेल्या सुमधूर गाण्यांनी सर्व मंत्रमुग्ध झाले. जुन्या गप्पा, विनोद, नृत्य आणि संगीताच्या वातावरणात सर्व मित्र पुन्हा एकदा शाळेच्या बाकावर गेल्याचा अनुभव घेत होते.
कार्यक्रमाच्या शेवटी देशसेवेसाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुधीर मढवी, उदय दुर्गे, प्रदीप मेहता आणि संकेत पारटे यांनी अथक परिश्रम घेतले.

सामाजिक वसा
या स्नेहमेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ आनंद साजरा न करता सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्णय घेण्यात आला. सचिन दाभोळकर यांनी या मेळाव्यात जमा झालेला निधी गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केला जाईल. भविष्यातही सामाजिक कार्यावर भर देण्याचा संकल्प यावेळी सर्व मित्रांनी एकमताने सोडला.

फोटो ओळ, पाली, .बा.वडेर हायस्कूल, पाली येथील १९८६ च्या बॅचचे माजी विद्यार्थी. (छायाचित्र, अमित गवळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com