हळदी-कुंकूतून अंधश्रद्धा निर्मूलनाचा जागर
हळदी-कुंकूतून अंधश्रद्धा निर्मूलनाचा जागर
विधवा, विभक्त महिलांना मानाचे स्थान; सामाजिक परिवर्तनाचा वस्तुपाठ
पाली, ता. २१ (वार्ताहर) : खारपाडा येथ अन्वी व मायरा घरत यांच्या बोरन्हाण कार्यक्रमानिमित्त आयोजित करण्यात आलेला हळदी-कुंकू सोहळा केवळ पारंपरिक धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक परिवर्तनाचा प्रभावी वस्तुपाठ ठरला. समाजात खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धा, भेदभाव आणि रूढ परंपरांना छेद देत या कार्यक्रमातून विधवा व विभक्त महिलांना मानाचे स्थान देण्यात आले. तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणारे प्रबोधनात्मक उपक्रम राबवण्यात आल्याने या सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) रायगड जिल्हा कार्याध्यक्ष संदेश गायकवाड यांचे प्रभावी प्रबोधन. स्त्रिया आणि अंधश्रद्धा, या विषयावर त्यांनी महिलांशी थेट संवाद साधला. केवळ भाषणापुरते न थांबता, तथाकथित चमत्कारांचे प्रत्यक्ष सादरीकरण करून त्यामागील वैज्ञानिक सत्य उलगडून दाखवले. पाण्याने दिवा पेटवणे, हवेतून वस्तू काढणे, लिंबातून रक्त काढणे, पेटता कापूर हातावर ठेवणे यांसारख्या चमत्कारांमागे असलेली हातचलाखी व विज्ञान त्यांनी प्रयोगांद्वारे स्पष्ट केले. भोंदू बाबा आणि अंधश्रद्धांच्या जाळ्यात न अडकता महिलांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या सोहळ्याला सामाजिक कार्यकर्त्या माधुरी घरत, मालती म्हात्रे, भीमाबाई घरत व निर्मला कृष्णा ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
...................
चौकट : सामाजिक विषमतेवर प्रहार
घरत कुटुंबीयांनी समाजातील एक महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय हाताळत धाडसी पाऊल उचलले. अनेकदा विधवा किंवा विभक्त महिलांना शुभ कार्यांमध्ये दुय्यम स्थान दिले जाते. मात्र, या कार्यक्रमाची सुरुवात अशाच महिलांच्या हस्ते करून या अनिष्ट प्रथेला ठाम छेद देण्यात आला. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला. अशा उपक्रमांमुळे आमचा आत्मविश्वास वाढतो आणि समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बदलतो, अशी भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

