रायगड जिल्हा परिषदेची डिजिटल अध्यापनाला चालना
रायगड जिल्हा परिषदेकडून डिजिटल अध्यापनाला गती
गुणवत्ता कार्यशाळेत १७० केंद्रप्रमुखांचा सहभाग; नावीन्यपूर्ण पद्धतींवर भर
अलिबाग, ता. १८ (बातमीदार) ः रायगड जिल्हा परिषद यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत महानगर गॅस लिमिटेड व प्रथम फाउंडेशन यांच्या सहकार्याने अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये गुणवत्ता कार्यशाळा घेण्यात आली. ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे, डिजिटल शाळांची संकल्पना बळकट करणे आणि आधुनिक अध्यापन पद्धती शिक्षकांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. कार्यशाळेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते झाले. या वेळी शिक्षण विभागातील अधिकारी, प्रथम फाउंडेशनचे पदाधिकारी व जिल्ह्यातील सुमारे १७० केंद्रप्रमुख उपस्थित होते.
इयत्ता पहिली ते आठवीच्या भाषा व गणित विषयांच्या पूर्वपरीक्षांचे विश्लेषण सादर करून विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, शिष्यवृत्ती सराव परीक्षा आणि निपुण उपक्रमाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ११ शाळा, सात शिक्षक व तीन केंद्रप्रमुखांचा या वेळी सन्मान करण्यात आला.
साधनांचा प्रभावी वापर
ग्रामीण शाळांमध्ये डिजिटल अध्यापन रुजवण्यासाठी शिक्षकांना तंत्रज्ञानाधारित अध्यापन, विद्यार्थीनिहाय प्रगतीचे विश्लेषण आणि परिणामकारक शिकवणी पद्धती आत्मसात करणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन या वेळी करण्यात आले. यामुळे शिक्षणाची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

