अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेची कोकण प्रांत बैठक

अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेची कोकण प्रांत बैठक

Published on

अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेची कोकण प्रांत बैठक
रायगड जिल्ह्यातील उपक्रमांचे कौतुक; युवकांना भरती मार्गदर्शन व देशप्रेम जागृतीवर भर
अलिबाग, ता. १९ : परहूर येथे अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद कोकण प्रांताची वार्षिक सर्वसाधारण बैठक उत्साहात पार पडली. पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी व माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत विविध जिल्हाध्यक्षांनी आपल्या जिल्ह्यांचा कार्यआढावा सादर केला. राज्य संघटकांनी सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. रायगडमध्ये नायक संतोष तावडे यांनी विद्यार्थ्यांना भारतीय सेनादलाच्या मोहिमांची माहिती देत युवकांमध्ये देशप्रेमाची भावना रुजवली तसेच अग्निवीर व अधिकारी भरतीसाठी मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
कॅप्टन उमेश वाणी यांनी गेली नऊ वर्षे युवकांना पोलिस व सैन्य भरतीसाठी विनामूल्य शारीरिक प्रशिक्षण दिल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र-गोवा संघटन मंत्री रमेश देसाई, उपाध्यक्ष ब्रिगेडियर अजित श्रीवास्तव आणि कोकण प्रांत अध्यक्ष मेजर विनय देगावकर यांनी संघटनेच्या विस्तार व भावी उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते रविकिरण काळे यांनी संघटनात्मक बळकटीवर भर दिला.
-----
छायाचित्र मजकूर (कॅप्शन) :
परहूर येथे पार पडलेल्या अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद, कोकण प्रांताच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व माजी सैनिक.

Marathi News Esakal
www.esakal.com