नागालँडच्या अधिकाऱ्यांची जिल्हा बॅंकेला अभ्यासभेट
नागालँडच्या अधिकाऱ्यांची जिल्हा बॅंकेला अभ्यासभेट
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २४ : भारत सरकारच्या ॲक्ट इस्ट पॉलिसी अंतर्गत उत्तर-पूर्व भारताला दक्षिण-पूर्व आशियाशी मुख्यभूमी मार्गाने जोडण्यावर भर दिला जात आहे. अशातच, सहकारी बँकिंग व्यवस्था सक्षम करण्यासाठी नागालँडमधील सहकारी क्षेत्रातील १० वरिष्ठ अधिकारी व संचालकांच्या समितीने रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अभ्यासभेट दिली. या भेटीत बँकेच्या प्रगत आयटी प्रणाली, संस्थांचे संगणकीकरण, डिजिटल सेवा आणि व्यवसाय विविधीकरणाच्या मॉडेलचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांच्यासोबत सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी प्रशासन विभाग प्रमुख अजित भगत, कर्ज विभाग प्रमुख संजीव देशमुख, आयटी विभागप्रमुख नीलेश कदम, अकाउंट्स विभाग प्रमुख महेंद्र माळी आदी उपस्थित होते. नाबार्ड तपासणीत ‘अ’ वर्ग दर्जा मिळवणारी महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणून रायगड डीसीसी बँकेची ओळख आहे. मजबूत आर्थिक शिस्त, पारदर्शक लेखापद्धती आणि सक्षम जोखीम नियंत्रण ही तिची वैशिष्ट्ये आहेत. बँकेने कोअर बँकिंग सोल्युशन, मोबाईल बँकिंग, एसएमएस अलर्ट, एटीएम, रुपे कार्ड आणि युपीआयसारख्या सेवा प्रभावीपणे राबवल्या आहेत. जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा संस्थांचे पूर्ण संगणकीकरण करणारी देशातील पहिली जिल्हा बँक म्हणूनही तिने नवा आदर्श निर्माण केला आहे. ३१ जानेवारी २०२६ अखेर बँकेचा एकूण व्यवसाय ७३५० कोटी रुपयांवर पोहोचल्याची माहिती देण्यात आली. दोन दिवसांच्या या भेटीत केंद्र कार्यालय व विविध शाखांना भेट देण्यात आली. उत्तर-पूर्व भारतातील सहकारी बँकिंग क्षेत्राच्या विकासासाठी रायगड मॉडेल उपयुक्त ठरेल, असा विश्वास नागालँडच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

