नागावमध्ये एमएसईबी सबस्टेशनसाठी जागा हस्तांतरण पूर्ण
नागावमध्ये एमएसईबी सबस्टेशनसाठी जागा हस्तांतरण पूर्ण
वीजप्रश्न सुटण्याची आशा, निसर्ग चक्रीवादळानंतरच्या पाठपुराव्याला यश
कमी व्होल्टेज व वारंवार खंडित होणाऱ्या पुरवठ्यापासून दिलासा
अलिबाग, ता. २८ (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील नागाव ग्रामपंचायत हद्दीतील डावाळे परिसरात एमएसईबी सबस्टेशन उभारण्यासाठी आवश्यक जागेचे भाडेतत्त्वावर हस्तांतरण अधिकृतरीत्या पूर्ण झाले आहे. निसर्ग चक्रीवादळावेळी खेडेगावांमध्ये जवळपास महिनाभर वीजपुरवठा खंडित राहिल्याचा अनुभव लक्षात घेऊन सरपंच हर्षदा मयेकर यांनी या प्रकल्पाची मागणी केली होती. सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर दीर्घकाळ प्रलंबित असलेली प्रक्रिया मार्गी लागली.
या कामासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे, तहसीलदार विक्रम पाटील, एमएसईबीचे मुख्याधिकारी शैलेश कुमार, सब-रजिस्ट्रार रविराज सुपेकर तसेच माजी सरपंच निखिल मयेकर व राजेंद्र मयेकर यांचे सहकार्य लाभले. सध्या थळ सबस्टेशनवरून कोर्लईपर्यंतच्या लाईनद्वारे नागावला वीजपुरवठा होत असल्याने ओव्हरलोड, कमी व्होल्टेज व वारंवार खंडित होणारा पुरवठा यांसारख्या समस्या निर्माण होत आहेत. डावाळे येथील नव्या सबस्टेशनमुळे नागाव परिसरातील वीजयंत्रणेत मूलभूत सुधारणा होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोट :
डावाळे येथील सबस्टेशनमुळे नागाव परिसरातील नागरिकांचा कमी व्होल्टेज, वारंवार वीज खंडित होणे व लाईन ओव्हरलोडचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असून भविष्यातील वीजपुरवठा अधिक सक्षम होईल.
— सरपंच. हर्षदा मयेकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

