

‘गोष्ट मराठीची’ कथा अभिवाचन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ११ ः पारिजात मुंबई या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित करण्यात येणारी ‘गोष्ट मराठीची’ ही शालेय विद्यार्थ्यांसाठी सांघिक कथा अभिवाचन स्पर्धा रविवार (ता. १) सुधागड एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय कुरूळ, अलिबाग येथे झाली.
या स्पर्धेत एकूण १० शाळांमधील २० संघांमधून ८५ विद्यार्थी सहभागी झाले. अलिबागमध्ये प्रथमच ‘गोष्ट मराठीची’ स्पर्धा आयोजित करूनही शाळांचा व विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता. स्पर्धेचे परीक्षण शिक्षिका प्रमिला वैभव शेळके यांनी केले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी दुपारी पार पडला. या वेळी परीक्षकांनी विद्यार्थ्यांना कथा अभिवाचनाविषयी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी मराठी काव्य, पोवाडे व नाट्य सादरीकरण केले. पारिजात मुंबई आणि गंमत शाळा अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास श्रद्धा पोखरणकर, हिमालय चोरघे, सुशांत म्हात्रे, अवंती वर्तक, अनिष पानसरे, सुनील यादव, गौरी पालवणकर हे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच विद्यार्थी, शिक्षक, पालक व पारिजातचे स्नेही असे एकूण १२० हून अधिक जण उपस्थित होते.
अलिबाग येथील स्पर्धेत पाचवी ते सातवी गटामधून पी.एन.पी. माध्यमिक शाळा, वेश्वी (कथा- नाद, लेखक- द. मा. मिराजदार) या शाळेने प्रथम, सं. मं. हायस्कूल, नागाव (कथा- पिटक्या डुकराची गोष्ट) या शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच रा.जि.प. शाळा, वायशेत (कथा- हत्तीला वाचविणे, लेखक- आ. ना. पेडणेकर) या शाळेला उत्तेजनार्थ प्रमाणपत्र प्राप्त झाले. तसेच उत्तम अभिवाचक म्हणून मनस्वी राकेश कोरगावकर व ध्रुव किरण म्हात्रे यास प्रमाणपत्र प्राप्त झाले.
तसेच, या स्पर्धेतील आठवी ते दहावी या गटामधून पी.एन.पी. माध्यमिक शाळा, वेश्वी (कथा- श्यामची आई, लेखक- साने गुरुजी) या शाळेने प्रथम, पी.एन.पी. होली चाइल्ड, वेश्वी (कथा- अंधारातून प्रकाशाकडे) या शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच पी.एन.पी. सायरस पूनावाला इंग्लिश मीडियम स्कूल, नागाव (कथा- चिमुकली दिवटी, लेखिका- सुधा मूर्ती) या शाळेला उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाले. उत्तम अभिवाचक म्हणून उपासना उत्तम पाटीलला प्रमाणपत्र प्राप्त झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.