पडसरे आश्रमशाळेत ''छोटे सायंटिस्ट'' अवतरले भावी वैज्ञानिकांनी सादर केले विज्ञानाचे अविष्कार हायड्रोपोनिक शेती व सोलर कुकरच्या प्रयोगांनी वेधले लक्ष
आश्रमशाळेत अवतरले ‘छोटे सायंटिस्ट’
हायड्रोपोनिक शेती व सोलर कूकरच्या प्रयोगांनी वेधले लक्ष
पाली, ता. ३ (वार्ताहर) ः विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला वाव मिळावा, या उद्देशाने अनुदानित आश्रमशाळा पडसरे येथे राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आपले कल्पक प्रयोग सादर करत उपस्थितांची मने जिंकली. विशेषतः हायड्रोपोनिक शेती व सोलर कूकरच्या प्रयोगांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
हे प्रदर्शन पडसरे आश्रमशाळा, शापूरजी पालोनजी ॲण्ड कंपनी लिमिटेड, एएफसीओएनसी, ज्ञानप्रबोधिनी आणि पाबळ विज्ञान आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने भरवले होते. कार्यक्रमास संस्थेचे संचालक रवींद्र लिमये, संचालिका शिल्पा लिमये, एसपीसीएलतर्फे झरीन कमिशनराईट व शीतल अरोरा, ज्ञानप्रबोधिनीचे ओंकार बाणाईत, विज्ञान आश्रमाचे शरद जाधव, मुख्याध्यापक संदीप शिंदे आणि प्राथमिक मुख्याध्यापिका मीनाक्षी ढोपे उपस्थित होते. तसेच, खवली केंद्र प्रमुख बैकर, चिवे आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, करुण हंबीर, रोहा तालुका गणित-विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष खाडे आणि अडसूळ यांनी प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले.
उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या प्रथम तीन क्रमांकांच्या विद्यार्थ्यांना आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. महान शास्त्रज्ञ सी. व्ही. रमन यांच्या कार्याचे स्मरण करत, विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा, असे आवाहन मान्यवरांनी केले. या प्रदर्शनाला पालक आणि परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. शाळा प्रशासन, शिक्षक आणि स्वयंसेवकांच्या परिश्रमामुळे हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी झाले.
पर्यावरणपूरक प्रकल्पांचे सादरीकरण
विशेष म्हणजे, एएफसीओएनसी आणि एसपीसीएल कंपनीतील अधिकारी व अभियंत्यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून विद्यार्थ्यांना या प्रयोगांसाठी विशेष तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले होते. ‘छोटे सायंटिस्ट’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी ध्वनी, प्रकाशाचे परावर्तन, विद्युत ऊर्जा आणि चुंबकत्व या विषयांवरील प्रयोग प्रभावीपणे मांडले. तसेच कौशल्याधारित शिक्षण विभागामार्फत गांडूळ खत निर्मिती, हायड्रोपोनिक शेती पद्धत (विना मातीची शेती), सोलर कूकर यांसारख्या पर्यावरणपूरक प्रकल्पांचे सादरीकरण केले.
फोटो ओळ,
पाली ः आश्रमशाळेतील विद्यार्थी विज्ञान प्रदर्शनात सादरीकरण करताना सोबत उपस्थित मान्यवर व शिक्षक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

