

अंकुश आपटे युवा प्रतिष्ठानतर्फे १५१ माता-भगिनींना स्कार्फ वाटप
पाली, ता. ९ (वार्ताहर) ः वाढत्या उन्हापासून संरक्षण व्हावे या भावनेतून १५१ माता-भगिनींना स्कार्फ वाटप करून नारी शक्तीचा गौरव करण्यात आला. अंकुश आपटे यांच्या वतीने आयोजित रविवारी (ता. ८) सायंकाळी बल्लाळेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ हा सोहळा पार पडला.
याप्रसंगी भाजप दक्षिण रायगडचे जिल्हा उपाध्यक्ष आलाप मेहता, भाजप पाली शहरप्रमुख सुशील शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ललित ठोंबरे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा रूपाली भणगे, करुणा ठोंबरे, राबगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच स्नेहा संदेश भोईर, शिरीश सकपाळ, भाजप युवा कार्यकर्ते किरण पिंपळे, युगंधरा उपाध्ये यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन अंकुश आपटे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आले होते.
फोटो ओळ,
पाली ः मान्यवरांच्या उपस्थितीत महिलांना स्कार्फचे वाटप करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.