प्रलंबित मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा वाशी बोर्डावर धडक मोर्चा

प्रलंबित मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा वाशी बोर्डावर धडक मोर्चा

Published on

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांचा वाशी बोर्डावर धडक मोर्चा
पाली, ता. १४ (वार्ताहर) ः शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्न आणि शिक्षण मंडळातील कथित भ्रष्टाचाराविरोधात गुरुवारी (ता. १२) मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने वाशी येथील विभागीय शिक्षण मंडळावर तीव्र निदर्शने करण्यात आली. या मोर्चात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलक शिक्षकांनी प्रशासनाच्या दिरंगाईबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.
अनेक शिक्षकांच्या नियुक्त्या होऊनही त्यांच्या मान्यतेचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. तांत्रिक अडचणींमुळे शिक्षकांना शालार्थ आयडी मिळण्यास विलंब होत आहे. अनेक महिन्यांपासून रखडलेल्या वेतनामुळे शिक्षकांमध्ये आर्थिक ओढाताण निर्माण झाली आहे. यासह वरिष्ठ आणि निवड श्रेणीचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. प्रा. आंधळकर, प्रा. दीक्षित, प्रा. सिंग आणि प्रा. अहिरे यांनी आपल्या भाषणातून प्रशासकीय दिरंगाईचा निषेध करत, न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशारा दिला.
या मोर्चात रायगड जिल्ह्यातून प्रा. बिराजदार, प्रा. कीर्तने, प्रा. शिद आणि प्रा. मेंडण यांच्यासह शेकडो प्राध्यापक सहभागी झाले होते. आपल्या मागण्यांचे निवेदन बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सोपवले असून, सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.


फोटो ओळ,
पाली ः प्रलंबित मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी वाशी बोर्डावर धडक मोर्चा काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com