इंधन पुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क

इंधन पुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क
Published on

इंधनपुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क
तालुकानिहाय संपर्क अधिकारी नियुक्त; १०७७ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १८ : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या पुरवठ्यात नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. संभाव्य अडचणी लक्षात घेऊन नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी तालुकानिहाय संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
घरगुती एलपीजी गॅससंदर्भातील तक्रारी व पुरवठ्यातील अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात पुरवठा निरीक्षण अधिकारी तसेच महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली आहे. नागरिकांच्या समस्या त्वरित मार्गी लावण्यासाठी तालुकानिहाय संपर्क अधिकारी, त्यांचे पदनाम व मोबाईल क्रमांक प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण आल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक १०७७ उपलब्ध करून देण्यात आला असून, या क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळू शकते. बुधवार (ता.१८) रोजी यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यामध्ये तालुकानिहाय्य अधिकाऱ्यांच्या नेमणुका करून त्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली.
दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत माध्यमांद्वारे मिळणारी माहितीच ग्राह्य धरावी, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे. गॅस व इंधनाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क व सज्ज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com