पालीमध्ये पोलिसांकडून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा सामाजिक सलोख्याचे दर्शन

पालीमध्ये पोलिसांकडून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा सामाजिक सलोख्याचे दर्शन

Published on

पालीमध्ये पोलिसांकडून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा
पाली, ता. २१ (वार्ताहर) ः पवित्र रमजान आणि ईद-उल-फित्रनिमित्त शनिवारी (ता. २१) तालुक्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यानिमित्त पाली पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक हेमलता शेरेकर यांनी मशिदीत जाऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यामुळे सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे दर्शन घडले.
याप्रसंगी हेमलता शेरेकर यांनी पाली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सुलतान बेनसेकर यांना पुष्पगुच्छ देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मशिदीत उपस्थित असलेल्या इतर मुस्लिम बांधवांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या. सण-उत्सव हे समाजाला जोडण्याचे काम करतात. अशा प्रसंगी एकमेकांच्या आनंदात सहभागी झाल्याने सामाजिक ऐक्य अधिक मजबूत होते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी हेमलता शेरेकर यांच्यासोबत उपनगराध्यक्ष सुलतान बेनसेकर आणि पाली पोलिस ठाण्यातील इतर पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि मुस्लिम समुदायातील प्रतिष्ठित नागरिक व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यात सर्वत्र शांततेत आणि आनंदी वातावरणात ईद साजरी करण्यात आली.

फोटो ओळ,
पाली ः रमजाननिमित्त मशिदीमध्ये जाऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

Marathi News Esakal
www.esakal.com