माणगाव येथील मगरीला सुरक्षित बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश

माणगाव येथील मगरीला सुरक्षित बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश
Published on

माणगाव येथील मगरीला सुरक्षित बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश
वनविभागाच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात मुक्तता
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. २८ (वार्ताहर) : माणगाव तालुक्यातील पहेल गावातील सार्वजनिक तलावात गेल्या चार वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या मगरीला अखेर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असल्याने आणि पाणी कमी झाल्याने मगरीच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये, या उद्देशाने ही मोहीम बुधवारी (ता. २५) राबवण्यात आली.
सध्या तलावाचे सुशोभीकरण आणि सुरक्षा भिंतीचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी तलावातील पाणी पूर्णपणे उपसण्यात आले होते. तलावात केवळ चिखल आणि थोड्या प्रमाणात पाणी शिल्लक राहिल्याने मगर उघड्यावर आली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गावाचे सरपंच प्रसाद मांजरे यांनी तातडीने बचाव पथकाला पाचारण केले. माहिती मिळताच पथक घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केली असता चिखलात मगर असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती तत्काळ वनविभागाला देण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाची टीम आणि बचाव पथकाने अत्यंत सतर्कतेने मगरीला ताब्यात घेतले. त्यानंतर वनविभागाच्या देखरेखीखाली या मगरीला तिच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले आहे. मगरीला सुरक्षित अधिवास मिळाल्याने ग्रामस्थांनी आणि प्राणीप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.
कोट
तलावाचे काम सुरू असल्याने मगरीला सुरक्षित ठिकाणी हलवणे गरजेचे होते. बाहेर काढण्यात आलेली मगर सुदृढ आहे. तिची लांबी साडेचार फूट असून वजन साधारण वीस किलो आहे. ग्रामस्थ आणि वनविभागाच्या सहकार्यामुळे ही मोहीम यशस्वी झाली.
सागर दहिंबेकर, रेस्क्यू टीम सदस्य

फोटो ओळ, पाली, मगरीच्या यशस्वी रेस्क्यू मोहिमेत सहभागी वनविभागाचे अधिकारी आणि रेस्क्यू टीम. (छायाचित्र, अमित गवळे)

फोटो ओळ, पाली, सागर दहिंबेकर, रेस्क्यू टीम सदस्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com