तेजस उपक्रमातून इंग्रजी शिक्षणाला चालना

तेजस उपक्रमातून इंग्रजी शिक्षणाला चालना
Published on

तेजस उपक्रमातून इंग्रजी शिक्षणाला चालना
रायगडमध्ये ‘टॅग’ समन्वयकांचा गौरव सोहळा उत्साहात
पाली, ता. ३० (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये इंग्रजी विषयाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘तेजस’ उपक्रमांतर्गत कार्यरत तालुका व केंद्र समन्वयकांचा गौरव सोहळा कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पार पडला. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रायगड यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात २०२५-२६ या वर्षात कार्यरत समन्वयकांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला. समन्वयकांनी ऑनलाइन मार्गदर्शन घेऊन शिक्षकांना इंग्रजी विषयाचे क्षमतानिहाय प्रशिक्षण दिल्याने अध्यापन अधिक प्रभावी झाले आहे.
कार्यक्रमास डॉ. राजेश येवले व मोहन कोनगिरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्राचार्या रत्नप्रभा भालेराव, ललिता दहीतुले व सुवर्णा तोरणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले. सुधागड तालुक्यातील जनार्दन भिलारे, प्रियंका ठोकळ, राणी कदम, स्वाती हंडोरे, राकेश गदमले आणि वैशाली चौधरी आदी समन्वयकांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमामुळे जिल्ह्यात इंग्रजी शिक्षणाला नवी दिशा मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले. सुधागड तालुक्यातील या यशासाठी गट शिक्षणाधिकारी साधुराम बांगारे, सर्व केंद्रप्रमुख आणि इंग्रजी विषय साधनव्यक्ती प्रविणा खैरे यांचे विशेष सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com