रवींद्रनाथ ओव्हाळ यांना ‘निर्भीड पत्रकार सन्मान’ जाहीर

रवींद्रनाथ ओव्हाळ यांना ‘निर्भीड पत्रकार सन्मान’ जाहीर
Published on

रवींद्रनाथ ओव्हाळ यांना ‘निर्भीड पत्रकार सन्मान’ जाहीर
पाली (वार्ताहर) : रायगड प्रेस क्लबतर्फे दिला जाणारा सन २०२६ चा ‘प्रकाश काटदरे स्मृती निर्भीड पत्रकार सन्मान’ ज्येष्ठ पत्रकार रवींद्रनाथ ओव्हाळ यांना जाहीर झाला आहे. ८ एप्रिल रोजी पनवेल येथे होणाऱ्या सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. गेल्या तीन दशकांपासून पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ओव्हाळ यांनी आपल्या लेखणीद्वारे जनसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले आहेत. त्यांच्या निर्भीड व समाजाभिमुख कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला. यापूर्वीही त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या निवडीबद्दल रायगडसह पाली-सुधागड परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com