पाली मुख्य प्रवेश रस्त्याच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात

पाली मुख्य प्रवेश रस्त्याच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात
Published on

पाली मुख्य प्रवेश रस्त्याच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात
श्रीकांत ठोंबरे यांच्या पाठपुराव्याला यश; नागरिकांना दिलासा
पाली, ता. २ (वार्ताहर) : पाली शहरातील मुख्य प्रवेश रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधत भाजपचे सुधागड तालुकाध्यक्ष श्रीकांत ठोंबरे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, सोमवारी (ता. ३०) पासून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
‘मिनीडोअर स्टँड’ परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. रस्त्यावरील खडी उखडल्याने धुळीचे प्रमाण वाढले होते, तर उडणाऱ्या खडीमुळे अपघातांचाही धोका निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर श्रीकांत ठोंबरे यांनी आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री रवींद्र पाटील यांच्याकडे लेखी निवेदन देत तातडीने डांबरीकरणाची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत संबंधित विभागाने निधी व यंत्रणा उपलब्ध करून देत रविवारी सकाळपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.
या कामामुळे गेल्या काही दिवसांपासून त्रस्त असलेल्या पालीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोट
शहराचा मुख्य प्रवेश रस्ता सुस्थितीत असणे अत्यंत आवश्यक होते. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन आम्ही केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, कामाला सुरुवात झाली आहे. दर्जेदार काम व्हावे हीच आमची प्राथमिकता आहे.
श्रीकांत ठोंबरे, अध्यक्ष, भाजप सुधागड तालुका

फोटो ओळ, पाली, रस्त्याचे सुरु झालेले काम.
फोटो ओळ, पाली, श्रीकांत ठोंबरे, अध्यक्ष, भाजपा सुधागड तालुका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com