मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात २ प्रवाशांचा मृत्यू, ३५ ते ३८ जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात २ प्रवाशांचा मृत्यू, ३५ ते ३८ जखमी
Published on

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात
दोन प्रवाशांचा मृत्यू, ३५ ते ३८ जखमी

पाली, ता. ३ (वार्ताहर) ः मुंबई-गोवा महामार्गावर नागोठण्याजवळील सुकेळी खिंडीत शुक्रवारी (ता. ३) पहाटे एका खासगी स्लीपर कोच बसचा भीषण अपघात झाला. यात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर ३५ ते ३८ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी आठ ते नऊ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
बचाव पथकातील सदस्य सागर दहिंबेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही खासगी बस मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होती. सुकेळी खिंडीतील तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली. चालकाचा ओव्हर स्पीड आणि रस्त्याचे धोकादायक वळण हे या अपघाताचे मुख्य कारण असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, कोलाड आणि नागोठणे पोलिस ठाण्यातील कर्मचारी आणि रुग्णवाहिका यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. दहिंबेकर यांनी सांगितले, की सुकेळी खिंडीत गोव्याहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत. प्रशासनाने तिथे योग्य नियोजन केल्याने वर्षभरात अपघात थांबले होते; मात्र आता मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
--------------
पाली ः मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी खिंडीत झालेल्या भीषण अपघातानंतर बसची झालेली दुरवस्था आणि घटनास्थळी दाखल झालेली पोलिस यंत्रणा व बचाव पथक. (छायाचित्र ः अमित गवळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com