

प्राचार्य डॉ. रवींद्र राठोड यांना ‘महाराष्ट्र गौरव रत्न’ पुरस्कार
विधी शिक्षण व सामाजिक कार्याची राज्यस्तरीय दखल
पाली, ता. ६ (वार्ताहर) : माणगाव येथील नामदेव सुर्वे लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. ॲड. रवींद्र पांडुरंग राठोड यांना २०२६ चा मानाचा ‘महाराष्ट्र गौरव रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथे रविवारी (ता. ५) आयोजित दिमाखदार सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात आला.
विद्याराज फाउंडेशन प्रस्तुत व शिवमनी स्टुडिओ आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान देण्यात आला. विधी शिक्षणाच्या प्रसारासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. राठोड यांनी केलेले कार्य उल्लेखनीय ठरले आहे. त्यांच्या योगदानामुळे शैक्षणिक क्षेत्राला नवी दिशा मिळाल्याचे गौरवोद्गार या वेळी काढण्यात आले.
प्राचार्य म्हणून कार्य करताना त्यांनी प्रशासकीय जबाबदारीबरोबर सामाजिक बांधिलकीही जपली आहे. हा पुरस्कार माझ्या संस्थेचा व विद्यार्थ्यांचा आहे. यामुळे अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा मिळाली, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन दिलीप लहानू बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
फोटो ओळ, पाली, पुणे येथे आयोजित सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते ‘महाराष्ट्र गौरव रत्न पुरस्कार’ स्वीकारताना डॉ. ॲड. रवींद्र राठोड.