मृगगडावर संवर्धनाचा जागर श्रमदानातून ऐतिहासिक पाण्याच्या टाक्यांनी घेतला मोकळा श्वास गडकरी परिवार व स्वयंपूर्ण सुधागडचा स्तुत्य उपक्रम

मृगगडावर संवर्धनाचा जागर श्रमदानातून ऐतिहासिक पाण्याच्या टाक्यांनी घेतला मोकळा श्वास गडकरी परिवार व स्वयंपूर्ण सुधागडचा स्तुत्य उपक्रम
Published on

मृगगडावर संवर्धनाचा जागर
श्रमदानातून ऐतिहासिक पाण्याच्या टाक्यांनी घेतला मोकळा श्वास
पाली, ता. १४ (वार्ताहर) ः सह्याद्रीच्या कुशीतील ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी सुधागड तालुक्यातील मृगगडावर विशेष संवर्धन मोहीम राबवण्यात आली. गडकरी परिवार आणि स्वयंपूर्ण सुधागड या संस्थांच्या वतीने रविवारी (ता. १२) ही मोहीम यशस्वीपणे पार पडली. या वेळी स्वयंसेवकांनी गडावरील गाळाने भरलेल्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करून श्रमदानाचा आदर्श घालून दिला.
सुधागड तालुक्यातील भेलीव गावालगत असलेला मृगगड एक हजार ७५० फूट उंचीचा असून, तो आकाराने लहान असला तरी त्याची रचना सामरिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. गडावर सध्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने, पावसाळ्यापूर्वी पाण्याची टाकी स्वच्छ करण्यावर या मोहिमेत भर देण्यात आला. विशेष म्हणजे, नोव्हेंबर २०२४ मध्ये साफ केलेल्या टाकीत आता पाण्याचा साठा झाल्याने स्वयंसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या मोहिमेत २५ ते ३० स्वयंसेवकांनी सहभाग घेत रविवारी (ता. १२) संपूर्ण गडाची स्वच्छता केली. टाक्यांमधील साचलेला गाळ, माती आणि पडलेले मोठे दगड बाहेर काढण्यासाठी स्वयंसेवकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी स्थानिक सरपंच, शिक्षक आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

दोन टाक्यांची स्वच्छता पूर्ण
या मोहिमेदरम्यान आतापर्यंत दोन टाक्यांमधील गाळ पूर्णपणे काढण्यात आला आहे. येत्या पुढील मोहिमेत तिसरी टाकी स्वच्छ करण्याचा निर्धार गडकरी परिवाराच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे.

पर्यटकांसाठी सूचना
मृगगडावर तटबंदी, गुहा, पाण्याच्या टाक्या आणि गडदेवतेची मूर्ती असे ऐतिहासिक अवशेष आहेत. पावसाळ्यात येथील निसर्ग सौंदर्य आणि धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. मात्र, गडाची वाट काही ठिकाणी अरुंद असून, दरी खोल असल्याने पर्यटकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. विशेषतः येथील चिमणी क्लाइंब आणि कातळात कोरलेल्या पायऱ्या चढताना काळजी घेणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com