

अलिबागचे सन्मान पाटील यांची न्यायाधीशपदी झेप
ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेजमध्ये विशेष सन्मान
अलिबाग, ता. १५ (बातमीदार) : एका वकिलाचा मुलगा आज आपल्या जिद्दीच्या जोरावर न्यायाधीश बनला ही बाब दोन्ही महाविद्यालयांसाठी अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांनी काढले. अलिबागचे सन्मान पाटील यांनी न्यायाधीशपदी झेप घेतल्याने ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेजमध्ये त्यांचा विशेष सन्मान सोहळा आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात ते बोलत होते.
अलिबाग तालुक्यातील वाघ्रण गावचा सुपुत्र आणि जे.एस.एम. कॉलेज आणि ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ या दोन्ही महाविद्यालयांचा माजी विद्यार्थी ॲड. सन्मान पाटील याची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर परीक्षेत निवड झाली आहे. या देदीप्यमान यशाबद्दल महाविद्यालयाच्या पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे औचित्य साधून ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ तर्फे सन्मान पाटील आणि त्यांचे आई-वडील यांचा जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गौतम पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्याप्रसंगी जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील, जेएसएम महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रविण गायकवाड, लॉ कॉलेजच्या नॅक समन्वयक प्रा. निलम म्हात्रे आणि प्रा. डॉ. संदिप घाडगे यांनीही सन्मान पाटील यांचे अभिनंदन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. चिन्मय राणे, प्रा. पियुषा पाटील, प्रा. कौशिक बोडस आणि प्रा. सूरज पुरी यांनी विशेष परिश्रम घेतले.
फोटो ओळी : अलिबागचे एड.सन्मान पाटील यांनी न्यायाधीशपदी झेप घेतल्याने त्यांचा ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेजमध्ये विशेष सन्मान करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.