सुधागड तालुक्यात गॅससाठी ग्राहकांचा संताप एचपी गॅस एजन्सीच्या मनमानी कारभाराविरुद्ध तहसीलवर धडक गॅससाठी २५ किमीवर हेलपाटे उन्हात ताटकळणाऱ्या नागरिकांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा

सुधागड तालुक्यात गॅससाठी ग्राहकांचा संताप एचपी गॅस एजन्सीच्या मनमानी कारभाराविरुद्ध तहसीलवर धडक गॅससाठी २५ किमीवर हेलपाटे  उन्हात ताटकळणाऱ्या नागरिकांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा
Published on

सुधागड तालुक्यात गॅससाठी ग्राहकांचा संताप
एचपी गॅस एजन्सीच्या मनमानी कारभाराविरुद्ध तहसीलवर धडक
गॅससाठी २५ किमीवर हेलपाटे
उन्हात ताटकळणाऱ्या नागरिकांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा
पाली, ता. १६ (वार्ताहर) ः सुधागड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅसपुरवठ्याचा पुरता बोजवारा उडाला आहे. एचपी गॅस एजन्सीच्या नियोजनशून्य आणि ढिसाळ कारभारामुळे तालुक्यातील सुमारे तीन हजार ग्राहकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पाली येथील अधिकृत गॅस कार्यालय बंद करून ग्राहकांना सिलिंडरसाठी २५ किमी दूर माणगाव तालुक्यातील भागाड येथे हेलपाटे मारायला लावल्याने, गुरुवारी (ता. १६) संतप्त नागरिकांनी तहसील कार्यालयावर धडक दिली.
सध्या उन्हाचा कडाका वाढत असताना गॅस मिळवण्यासाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना पहाटेपासून लांबच लांब रांगांमध्ये उभे राहावे लागत आहे. त्यातच पालीचे गॅस कार्यालय बंद झाल्याने सिलिंडरसाठी पायपीट २५ किमी अंतर कापून माणगावात जावे लागत आहे. यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक आणि शारीरिक कंबरडे मोडत आहे. तासनतास प्रतीक्षा करूनही तांत्रिक कारणांमुळे अनेकदा रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याने या त्रासाला जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांनी विचारला आहे. नागरिकांनी नायब तहसीलदार भारत फुलपगारे व पुरवठा निरीक्षक सुखदेव वाढणकर यांची भेट घेतली.

प्रशासनाचे आदेश आणि इशारा
ग्राहकांचे गाऱ्हाणे ऐकून घेतल्यानंतर प्रशासनाने तत्काळ संबंधित गॅस एजन्सीला फोन करून त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. पाली येथे त्वरित कार्यालय सुरू करा आणि ज्या ग्राहकांचे बुकिंग पूर्ण झाले आहे, त्यांना घरपोच गॅस सेवा द्या, असे सक्त निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले.

तीव्र आंदोलनाचा इशारा
जर गॅस वितरणात सुधारणा झाली नाही, अतिरिक्त वितरण केंद्रे सुरू केली नाहीत आणि टोकन प्रणाली लागू केली नाही, तर आगामी काळात संपूर्ण तालुक्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सुधागडमधील संतप्त नागरिकांनी दिला आहे.

फोटो ओळ, पाली, गॅससाठी नागरिकांच्या रांगा. (छायाचित्र, अमित गवळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com