

उमटे धरणासाठी ५ कोटींच्या निधीची मागणी
गाळ काढणी व जलशुद्धीकरणासाठी संघर्ष ग्रुपचे निवेदन
अलिबाग, ता. २२ (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील गाळ व गढूळ पाण्याच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी ५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी, अशी मागणी उमटे धरण संघर्ष ग्रुपने केली आहे. याबाबतचे निवेदन ग्रुपचे एड. राकेश पाटील यांनी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांना सादर केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन राऊळ उपस्थित होते.
गेल्या १२ वर्षांपासून धरणातील गाळ साचण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, ३३ आदिवासी वाड्या आणि ४७ गावांतील नागरिकांना दूषित व गढूळ पाणी पुरवले जात आहे. सध्या चार दिवसांआड पाणीपुरवठा होत असून, त्यात मातीमिश्रित पाणी मिळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सन २०२२ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, माणगाव यांनी २१५ कोटींचा प्रस्ताव सादर केला होता; मात्र तो अद्याप प्रलंबित आहे. धरणासाठी उभारण्यात आलेला ४.५ दलली क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प मागील पाच वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. तसेच, ८ कोटींचे टेंडरही शासन स्तरावर अडकून पडले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कोट
पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नापेक्षा मोठा प्रश्न नाही. प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, असे ॲड राकेश पाटील यांनी म्हटले आहे.
चौकट
निधी उपलब्ध असूनही अंमलबजावणीचा अभाव
रायगड जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त आयोगांतर्गत सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे, तसेच यंदाचा १७५ कोटींचा अर्थसंकल्पही मांडण्यात आला आहे. अशा परिस्थितीत उमटे धरणातील जॅकवेल दुरुस्ती व गाळ काढणीसाठी ५ कोटींची तरतूद करणे कठीण नसल्याचे संघर्ष ग्रुपने स्पष्ट केले आहे. मोठ्या निधीच्या घोषणा करून कामे रखडवण्याऐवजी कमी खर्चात तातडीची उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.
............
फोटो ओळी :
उमटे धरण.
अँड राकेश नारायण पाटील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.