सोसायटी आदिवासीवाडीचा वनवास संपला

सोसायटी आदिवासीवाडीचा वनवास संपला
Published on

सोसायटी आदिवासीवाडीचा वनवास संपला
जनसहभागातून २० लाखांचा प्रकल्प; शेतकऱ्यांनी जमीन देत विकासाला हातभार
पाली, ता. २३ (वार्ताहर) : पाली नगर पंचायत हद्दीतील आदर्श आदिवासीवाडी येथील नागरिकांचा अनेक वर्षांचा रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. स्थानिक नगरसेविका स्वाती पाटील व तालुका नेतृत्वातील अनिल देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या दुर्गम भागात २० लाख रुपये निधीतून काँक्रीटचा पक्का रस्ता साकारला जात आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या वाडीमध्ये यापूर्वी साधा पायमार्गही उपलब्ध नव्हता. विशेषतः पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. आजारी व्यक्तींना झोळीतून मुख्य रस्त्यापर्यंत नेण्याची वेळ येत होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक नेतृत्वाने हा प्रश्न प्राधान्याने हाताळला.
रस्ता उभारणीसाठी जागेची अडचण निर्माण झाली होती. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांनी पुढाकार घेत प्रत्येकी काही फूट जमीन रस्त्यासाठी दान केली. त्यांच्या या सहकार्यामुळे सुरुवातीला माती भराव व खडीकरणाचे काम पूर्ण झाले. आता त्याच मार्गावर पक्का रस्ता उभारणीला वेग आला आहे. या कामासाठी नगर पंचायत पदाधिकारी, विविध पक्षांचे कार्यकर्ते व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

चौकट
जनसहभागातून शक्य झाला विकास
या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांचा सक्रिय सहभाग. शासकीय निधीसोबतच स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेल्या जमिनीमुळेच हा रस्ता प्रत्यक्षात येऊ शकला. यामुळे केवळ वाहतूक सुलभ होणार नाही, तर आरोग्य, शिक्षण व रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. हा रस्ता आदिवासीवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

कोट :
आदिवासीवाडीतील नागरिकांची परिस्थिती पाहून हा प्रश्न सोडवणे गरजेचे होते. आज दिलेला शब्द पूर्ण होताना समाधान वाटते. या रस्त्यामुळे येथील नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल होईल.
- अनिल देशमुख, तालुका पदाधिकारी

फोटो ओळ, पाली, काँक्रीटचा पक्का रस्ता होताना सोबत आदिवासी ग्रामस्थ व मान्यवर. (छायाचित्र, अमित गवळे)
फोटो ओळ, पाली, श्रीकांत ठोंबरे, अध्यक्ष, भाजप सुधागड तालुका अध्यक्ष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com