शासकीय कर्मचाऱ्यांचा एल्गार शासन अद्याप स्तब्ध चौथ्या दिवशीही राज्यव्यापी संप कायम

शासकीय कर्मचाऱ्यांचा एल्गार शासन अद्याप स्तब्ध चौथ्या दिवशीही राज्यव्यापी संप कायम
Published on

शासकीय कर्मचाऱ्यांचा संप कायम

पाली, ता. २४ (वार्ताहर) : राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेला बेमुदत संप आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. शासनासोबतची चर्चा निष्फळ ठरल्याने शुक्रवारी (ता. २४) सलग चौथ्या दिवशीही संप सुरू होता.

बुधवारी (ता. २२) मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या उपस्थितीत १८ मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. मात्र शासनाने नेहमीप्रमाणे केवळ सहानुभूती दर्शविली असून, ठोस निर्णय घेण्याबाबत कोणतीही हालचाल केलेली नाही. विशेषतः सुधारित पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता आलेली नाही. जोपर्यंत मुख्यमंत्री स्तरावर अधिकृत बैठक होऊन ठोस तोडगा निघत नाही तोपर्यंत संपाचा जोर कायम राहील, असा पवित्रा संघटना प्रतिनिधींनी घेतला आहे.

समन्वय समितीच्या सुकाणू समितीची गुरुवारी (ता. २३) दृकश्राव्य माध्यमातून बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, शुक्रवारी (ता. २४) चौथ्या दिवशीही संप सुरू ठेवण्यात आला. आंदोलनाची धार वाढवण्यासाठी प्रत्येक जिल्हा पातळीवर संपकरी मोर्चा काढून शासनाचा निषेध करण्यात येणार आहेत. राज्याप्रमाणेच रायगड जिल्ह्यातही या संपाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश पालकर, कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष संदीप नागे आणि निमंत्रक प्रभाकर नाईक यांनी रायगडमधील सर्व कर्मचाऱ्यांना चौथ्या दिवसाच्या संपात पूर्ण ताकदीने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी या संपात शुक्रवारीही सहभाग घेतला.

---------
ताकदीने लढू

याबाबत समन्वय समितीचे राज्य निमंत्रक विश्वास काटकर म्हणाले, की आम्ही गेल्या १५ महिन्यांपासून शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहोत, मात्र शासन दुजाभाव करीत आहे. आता आमच्या न्यायासाठी हा लढा पूर्ण ताकदीने लढला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com