लोणेरे लॉज खूनप्रकरणातील आरोपी ठाण्यातून जेरबंद

लोणेरे लॉज खूनप्रकरणातील आरोपी ठाण्यातून जेरबंद
Published on

खूनप्रकरणी एकाला ठाण्यातून अटक

अलिबाग, ता. २६ ः माणगाव तालुक्यातील गोरेगाव-लोणेरे परिसरातील एका लॉजमध्ये महिलेची निर्घृण हत्या करून फरार झालेल्या आरोपीला रायगड पोलिसांनी ठाणे शहरातून अटक केली आहे. अनिस मोहम्मदखान मालदार असे त्याचे नाव आहे.
लोणेरे येथील एका लॉजमध्ये अनिस मोहम्मदखान मालदारने एका महिलेच्या डोक्यावर तसेच दोन्ही हातांच्या मनगटांवर कोयत्याने वार करून तिचा खून केला होता. त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दोन स्वतंत्र पथके, तसेच संबंधित पोलिस ठाण्याची दोन पथके तयार करण्यात आली होती. तपासादरम्यान आरोपीविरुद्ध २०२१ मध्ये मुंब्रा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली. गेले चार दिवस तो एका डॉरमेट्रीमध्ये राहत असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा पुढील तपास महाड उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर काळे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com