ई-कचऱ्यावर अलिबागमध्ये प्रभावी मोहीम ई-कचऱ्यावर अलिबागमध्ये प्रभावी मोहीम

ई-कचऱ्यावर अलिबागमध्ये प्रभावी मोहीम
ई-कचऱ्यावर अलिबागमध्ये प्रभावी मोहीम
Published on

ई-कचऱ्यावर अलिबागमध्ये प्रभावी मोहीम
लायन्स क्लब व नगरपालिकेच्या पुढाकारातून पर्यावरण रक्षणाला चालना
अलिबाग (बातमीदार) : इलेक्ट्रॉनिक कचरा (ई-कचरा) ही आजच्या घडीला पर्यावरणासमोरील गंभीर समस्या बनली असून, भारत ई-कचरा निर्मितीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या पार्श्वभूमीवर जनजागृती, संकलन आणि योग्य विल्हेवाट यासाठी लायन्स क्लब अलिबागने पर्यावरण आठवड्यानिमित्त स्तुत्य उपक्रम राबविला.
१९ एप्रिल ते २६ एप्रिल यादरम्यान अध्यक्ष प्रदीप नाईक यांनी शहरातील नागरिक व सदस्यांना ई-कचरा जमा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत तब्बल ११५० किलो ई-कचरा संकलित करण्यात आला असून, तो पुढील प्रक्रियेसाठी रवाना करण्यात आला.
या उपक्रमाची जबाबदारी लायन अनिल आगाशे यांनी सांभाळली. त्यांना महेंद्र पाटील, संतोष पाटील, महेश कवळे, संजय माळी, विकास घरत, अभिजित आमले आणि नयन कवळे यांचे सहकार्य लाभले. क्लबच्या सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
अलिबाग नगरपालिकेच्या नगराध्यक्ष अक्षया नाईक, उपाध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे, गटनेते प्रशांत नाईक, सर्व नगरसेवक आणि मुख्याधिकारी सागर साळुंखे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

चौकट :
तीन टन ई-कचरा संकलनाचे लक्ष्य
लायन्स क्लब अलिबागच्या माध्यमातून ही मोहीम पुढील काळातही सुरू राहणार असून, किमान तीन टन ई-कचरा संकलित करून त्यावर योग्य प्रक्रिया करण्याचा निर्धार अध्यक्ष प्रदीप नाईक यांनी व्यक्त केला.
.......,
फोटो ओळी : अलिबाग लायन्स क्लब आणि अलिबाग नगर परिषदेच्या वतीने संकलित करण्यात आलेला ई-कचरा आज पुढील प्रक्रियेसाठी पाठविण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com