

आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी पालकांची धावपळ
पसंतीची शाळा मिळत नसल्याने रखडली प्रवेश प्रक्रिया; रायगडमध्ये ३,०४२ प्रवेश निश्चित
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ४ : आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेतून आवडीची शाळा शोधण्यात पालकांची धावपळ उडत आहे. त्यामुळे कागपत्रांची पडताळणी व प्रवेश निश्चिती प्रक्रियेस पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पालकांना ८ मेपर्यंत अंतिम संधी देण्यात आली आहे. विविध कारणांमुळे अनेक पालकांना निर्धारित कालावधीत आवश्यक कागदपत्रे सादर करता न आल्याने शिक्षण विभागाने ही मुदतवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे अद्याप प्रक्रिया पूर्ण न केलेल्या पालकांसाठी ही शेवटची संधी मानली जात आहे.
पालकांना हव्या असलेल्या शाळांचा कोटा पूर्ण झाल्याने पालकांनी इतर शाळांची निवड करणे टाळली आहे. यामुळे आरटीई प्रवेशासाठी पालक निरुत्साही असल्याचे दिसून येत आहे.
रायगड जिल्ह्यात २७० शाळा आरटीई प्रवेशासाठी पात्र ठरवण्यात आल्या आहेत. दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत शिक्षणाची संधी दिली जात आहे. यंदा रायगड जिल्ह्यात चार हजार ७८४ जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी नऊ हजार ४८९ अर्ज आलेले आहेत. प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठी १७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली होती. लॉटरीद्वारे चार हजार ३४५ अर्जांची निवड करण्यात आली. यातून आतापर्यंत तीन हजार ४२ प्रवेश निश्चित झाले आहेत तसेच एक हजार ३०३ विद्यार्थ्यांच्या पालकांनी विविध कारणांमुळे ४ मेपर्यंत प्रवेश निश्चित केलेले नाहीत.
शेवटची संधी ८ मेपर्यंत
प्रवेशासाठी प्रत्येक तालुक्यात आरटीई कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. या ठिकाणी ८ मेपर्यंत कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कालावधीत संबंधित पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी जन्मदाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, जातीचा दाखला (लागू असल्यास) अशी सर्व कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.