

महामानवाचा गौरव!
पाली बस स्थानक मार्गाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग’ असे नामकरण
पाली, ता. ७ (वार्ताहर) पाली नगर पंचायतीच्या वतीने शहराच्या विकासात आणि वैभवात भर घालणारा एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. पाली बस स्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाचे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग’ असे नामकरण करण्यात आले असून, नुकताच या नामफलकाचा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला.
नगरसेवक सुधीर भालेराव यांनी यापूर्वी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे ‘हटाळेश्वर चौक ते तहसील कार्यालय’ या मार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी केली होती. या मागणीला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. जनतेच्या या भावनेचा आदर करत नगर पंचायतीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. विशेष म्हणजे, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या सोहळ्याप्रसंगी नगराध्यक्ष पराग मेहता, उपनगराध्यक्ष सुलतान बेनसेकर, नगरसेवक आरिफ मनियार आणि नगरसेवक सुधीर भालेराव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्याला सुधागड तालुका बौद्धजन पंचायतचे अध्यक्ष दीपक पवार, मारुती गायकवाड, प्रभाकर गायकवाड, छनक शिर्के, नरेश शिंदे, राहुल सोनवणे, भगवान शिंदे, रवींद्रनाथ ओवाळ, राजेश गायकवाड, मोरेश्वर कांबळे, भीम महाडिक, चंद्रगुप्त भालेराव, जयवंत कांबळे, दिलीप मोरे, राहुल कांबळे, रमेश साळुंखे, मंगेश भालेराव तसेच रोहिणी जाधव, नूतन शिंदे, नयना वाघमारे, अक्षता जाधव आणि तालुक्यातील सर्व आंबेडकरी विचारधारेचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या नामकरणामुळे पाली शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, नगर पंचायतीच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
फोटो ओळ, पाली येथे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग’ नामफलकाचे अनावरण करताना नगराध्यक्ष पराग मेहता, उपनगराध्यक्ष सुलतान बेनसेकर, नगरसेवक सुधीर भालेराव, आरिफ मनियार आणि सुधागड तालुका बौद्धजन पंचायतीचे पदाधिकारी व भीम अनुयायी. (छायाचित्र, अमित गवळे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.