

अंबा नदीच्या पात्रातून रेजगाची चोरी
जांभुळपाड्यात अनधिकृत उत्खनन
पाली, ता. २२ (वार्ताहर) : जांभुळपाडा येथील अंबा नदी पात्रामध्ये अज्ञात व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणात रेजगा उत्खनन करून चोरी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अनधिकृत आणि बेसुमार उत्खननामुळे नदीच्या पात्रामध्ये मोठा खड्डा पडला असून, आगामी काळात नदीची धूप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर प्रकारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून, महसूल प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दोषींविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
नदीतील वाळू, रेजगा आणि गोटे यांचा संबंधित प्रशासनाच्या परवानगीशिवाय उपसा करणे हा खनिज नियमावलीनुसार बेकायदेशीर उत्खननाचा प्रकार मानला जातो. याचसोबत, पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार नैसर्गिक संसाधनांची चोरी करणे आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणे हा दखलपात्र गुन्हा ठरतो. त्यामुळे महसूल प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन अज्ञात दोषींविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करणे आणि फौजदारी कारवाई करणे आवश्यक आहे.
अंबा नदीतील रेजगा चोरीने पर्यावरणीय हानी पोहोचू शकते. त्यामुळे शासनाने आणि संबंधित यंत्रणेने यात कोणतीही दिरंगाई न करता तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.
फोटो ओळ, पाली, अंबा नदीपात्राततून काढण्यात आलेला रेजगा. (छायाचित्र, अमित गवळे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.