अलिबाग : जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त मशाल रॅली

अलिबाग : जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त मशाल रॅली
Published on

अलिबागमध्ये मशाल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त उपक्रम
अलिबाग, ता. २४ : खेळाची भावना आणि ऑलिम्पिक मूल्ये जनमानसात रुजवण्यासाठी जागतिक ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधून अलिबाग येथे मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले. रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, प्रीझम सामाजिक विकास संस्था आणि कुलाबा क्रीडा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या रॅलीत राष्ट्रीय खेळाडू तथा प्रीझम सामाजिक विकास संस्थेच्या संस्थापक तपस्वी गोंधळी, कुलाबा क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष यतीराज पाटील, सहाय्यक क्रीडा अधिकारी संदीप गुरव यांच्यासह विविध क्रीडा प्रकारांतील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. हातात मशाल घेऊन खेळाडूंनी शिस्तबद्ध पथसंचलन करत नागरिकांचे लक्ष वेधले.
रॅलीद्वारे ‘खेळा आणि देशाचे नाव उज्ज्वल करा’ हा संदेश देण्यात आला. ऑलिम्पिक दिन हा केवळ स्पर्धेचा नसून मैत्री, आदर आणि उत्कृष्टतेच्या मूल्यांचा उत्सव असल्याचे या वेळी अधोरेखित करण्यात आले.


............
फोटो ओळी :
जागतिक ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधून मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com