मल्लखांबावर दहीहंडीचा अनोखा उत्सव

मल्लखांबावर दहीहंडीचा अनोखा उत्सव
Published on

मल्लखांबावर दहीहंडीचा अनोखा उत्सव
जांभूळपाड्यात आसुडाची जुनी परंपरा
पाली, ता. २ (वार्ताहर) : येत्या शनिवारी (ता. ५) राज्यभर गोपाळकाल्याची धूम पाहायला मिळणार आहे. सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा येथील दहीहंडी उत्सव मात्र आपल्या अनोख्या परंपरेमुळे विशेष आकर्षण ठरणार आहे. येथे मल्लखांबावर दहीहंडी बांधून ती फोडण्याची रीत असून, गोविंदांच्या अंगावर आसुडाचे (चाबकाचे) फटके मारण्याची प्राचीन परंपराही आजतागायत जपली जात आहे.
उत्सवाच्या दिवशी गोविंदांच्या अंगात ‘कान्होबाचे वारे’ येत असल्याची ग्रामस्थांची श्रद्धा आहे. त्यानंतर ते घुमू लागतात. गावातील महिला त्यांची पूजा-अर्चा करतात. पुढे हे गोविंदा अंगावर आसुडाचे फटके मारून घेत संपूर्ण गावातून फिरतात आणि अखेरीस मल्लखांबावरील दहीहंडी फोडतात. ही परंपरा नेमकी केव्हापासून सुरू झाली, याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी ग्रामस्थांनी आपल्या पूर्वजांकडून चालत आलेली ही अनोखी प्रथा श्रद्धेने जतन केली आहे.
गोपाळकाल्याच्या दिवशी बालगोपाल घरोघरी जाऊन दहीकाला, फळे यांचा प्रसाद घेतात. तसेच त्यांच्यावर पाणी ओतून स्वागत केले जाते. त्यामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते.

नागरिकांची गर्दी
जांभूळपाड्यातील मल्लखांबावरील दहीहंडी आणि गोविंदांच्या अंगावर आसुडाचे फटके घेण्याची अनोखी परंपरा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक दरवर्षी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. आधुनिक काळातही ग्रामस्थांनी जपलेली ही प्राचीन परंपरा जांभूळपाड्याच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग बनली आहे.

फोटो ओळ, पाली, आसुडाचे फटके मारत मल्लखांबावरील दहीहंडी फोडतांना गोविंदा. (संग्रहित छायाचित्र)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com