गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणाकडे रवाना खोपोली-पाली राज्य महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा मुंबई गोवा महामार्गासाठी पर्यायी खुश्कीचा मार्ग मार्ग

गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणाकडे रवाना खोपोली-पाली राज्य महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा मुंबई गोवा महामार्गासाठी पर्यायी खुश्कीचा मार्ग मार्ग
Published on

खोपोली-पाली महामार्गावर वाहनांच्या रांगा
गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्यांची तारांबळ
पाली, ता. १२ (वार्ताहर) ः गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई येथून कोकणात जाणाऱ्या वाहनांमुळे शनिवारी (ता. १२) वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.  मुंबई-गोवा महामार्गाला एक उत्तम आणि वेळेची बचत करणारा पर्याय म्हणून कोकणवासी खोपोली-पाली मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. यामुळे सध्या परळी, नाणोसे गावापासून ते गोंदाव फाट्यापर्यंत तसेच परळी ते पेडली आणि पाली ते नांदगाव आदि ठिकाणी वाहनांची प्रचंड वर्दळ पाहायला मिळत आहे.
    विशेषतः पाली, पेडली, परळी आणि नांदगाव या संवेदनशील ठिकाणी पोलिसांकडून वाहतुकीचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. मुख्य बाजारपेठांमध्ये पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. स्थानिक तरुणांचीही वाहतूक नियंत्रणासाठी मदत घेतली जात आहे. कोकणात जाणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी पाली पोलिसांनी जागोजागी दिशादर्शक फलक लावले आहेत. पोलिस निरीक्षक उत्तम रिकामे स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक व्यवस्थेची पाहणी करत आहेत.
़़़़़़़़़़़़़़़़
कोकणात जाणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, यासाठी मुख्य बाजारपेठांसह महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सुरळीत वाहतुकीसाठी अतिरिक्त पोलिस कर्मचाऱ्यांचीही मदत घेण्यात आली आहे.
- उत्तम रिकामे, पोलिस निरीक्षक, पाली पोलिस ठाणे
----------------------------------------

पाली ः वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावर वाहनांच्या लागलेल्या रांगा. (छायाचित्र, अमित गवळे) 

पाली ः वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी तैनात पोलिस. (छायाचित्र, अमित गवळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com