

पुढच्या वर्षी लवकर या
दीड दिवसांच्या गणरायाला निरोप
पाली, ता. १५ (वार्ताहर) ः ‘पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष, पारंपरिक ढोल-ताशांचा गजर आणि जड अंतःकरणाने दीड दिवसाच्या गणरायाला मंगळवारी (ता. १५) पाली शहरासह संपूर्ण सुधागड तालुक्यात भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. आरती, पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे दीड दिवस हा भाग मंगलमय झाला होता.
विसर्जनाच्या दिवशी पाली येथील अंबा नदी घाटावर शेकडो भाविकांनी गर्दी केली होती. संपूर्ण विसर्जन सोहळा शांततेत आणि शिस्तीत पार पडण्यासाठी पोलिस प्रशासन आणि पाली नगरपंचायतीच्या वतीने चोख व्यवस्थापन करण्यात आले होते. पोलिस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रमुख चौक, विसर्जन घाट आणि संवेदनशील ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. वाहतूक नियंत्रण आणि शांतता राखण्यासाठी महिला पोलिस, वाहतूक शाखा व स्थानिक स्वयंसेवकांनी प्रभावी समन्वय साधला.
देवस्थान व नगर पंचायतीचे विशेष उपक्रम
श्री बल्लाळेश्वर देवस्थान आणि पाली नगर पंचायतीच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम राबवण्यात आले. घाटावर निर्माल्य संकलनासाठी विशेष कलश ठेवण्यात आले होते. नगर पंचायतीचे नगरसेवक, कर्मचारी आणि स्थानिक स्वयंसेवकांनी विसर्जन सुरळीत होण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
फोटो ओळ,
पाली ः दीड दिवसाच्या गणरायाला विसर्जनासाठी घेऊन जाताना नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.