कासारवाडीत विसर्जन घाटाचे लोकार्पण

कासारवाडीत विसर्जन घाटाचे लोकार्पण
Published on

कासारवाडीत विसर्जन घाटाचे लोकार्पण
गणेशभक्तांसाठी सुरक्षित व्यवस्था; कमी कालावधीत काम पूर्ण
पाली, ता. १८ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यातील कासारवाडी येथे नवनिर्मित गणपती विसर्जन घाटाचा लोकार्पण सोहळा गुरुवारी (ता. १७) उत्साहात पार पडला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविक आणि ग्रामस्थांच्या सुविधेसाठी उभारण्यात आलेल्या या घाटामुळे यंदाचा विसर्जन सोहळा अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सोयीस्कर होण्यास मदत होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुधागड तालुकाध्यक्ष तथा पंचायत समितीचे उपसभापती संदेश शेवाळे यांच्या हस्ते घाटाचे उद्घाटन करण्यात आले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पक्ष कटिबद्ध असून, ग्रामस्थांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
ग्रामस्थ उमेश जाधव यांनी घाटाची उभारणी कमी कालावधीत पूर्ण केल्याबद्दल संदेश शेवाळे यांचे आभार मानले. भाविकांसाठी सुंदर, सुरक्षित आणि सुसज्ज व्यवस्था निर्माण झाल्याने यंदा विसर्जन सोहळा अधिक सुलभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेवाळे यांची तत्परता, मेहनत आणि सेवाभावी वृत्ती समाजहिताच्या कामात प्रेरणादायी असल्याचेही जाधव यांनी नमूद केले. इतर ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केले.

भाविकांना मिळणार सुविधा :
नव्या घाटामुळे गणेशमूर्तींचे विसर्जन करताना भाविकांना सुरक्षित आणि व्यवस्थित जागा उपलब्ध होणार आहे. विसर्जनावेळी होणारी गर्दी नियंत्रित करण्यास तसेच सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यास या व्यवस्थेचा उपयोग होणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता झाली.

फोटो ओळ, पाली, कासारवाडी येथे नवनिर्मित गणपती विसर्जन घाटाचे थाटात लोकार्पण करताना संदेश शेवाळे व उपस्थित मान्यवर. (छायाचित्र, अमित गवळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com